Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, नाशिकसह जाणून घ्या महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या, पाहा आजचे ताजे अपडेट्स

द्य घडीला महाराष्ट्रात एकूण 52,667 रुग्ण आढळले असून त्यातील 1695 जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची सद्यची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमाचे पालन करावे अशी अपेक्षा केली जात आहे.

Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, नाशिकसह जाणून घ्या महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या, पाहा आजचे ताजे अपडेट्स
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

भारतासह महाराष्ट्र राज्यातही कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. सद्य घडीला महाराष्ट्रात एकूण 52,667 रुग्ण आढळले असून त्यातील 1695 जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची सद्यची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमाचे पालन करावे अशी अपेक्षा केली जात आहे. तसेच कोरोनाबाधितांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारकडून क्वारंटाइन आणि विलगीकरण कक्ष सुद्धा उभारण्यात येत आहे. कोरोना विरुद्ध लढण्यात राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आङे.

महाराष्ट्रात काल पुण्यात (Pune) 459 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 153 वर पोहचली आहे. यापैकी 280 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता नागरिकांच्या मनात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. Coronavirus: पुण्यात आतापर्यंत 6 हजार 153 जणांना कोरोनाचा संसर्ग; दिवसभरात 459 नव्या रुग्णांची नोंद तर, 8 लोकांचा मृत्यू

महाराष्ट्रातील जिल्हानिहाय COVID-19 रुग्णांची संख्या (25-26 May 2020 Updates) 

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 31,972 1026
2 ठाणे 457 4
3 ठाणे मनपा 2739 38
4 नवी मुंबई मनपा 2068 32
5 कल्याण डोंबिवली मनपा 941 8
6 उल्हासनगर मनपा 180 3
7 भिवंडी निजामपूर मनपा 98 3
8 मीरा भाईंदर 475 5
9 पालघर 120 3
10 वसई विरार मनपा 597 15
11 रायगड 431 5
12 पनवेल मनपा 360 12
ठाणे मंडळ एकूण 40438 1154
1 नाशिक 123 0
2 नाशिक मनपा 129 2
3 मालेगाव मनपा 721 44
4 अहमदनगर 57 5
5 अहमदनगर मनपा 20 0
6 धुळे 23 3
7 धुळे मनपा 95 6
8 जळगाव 301 36
9 जळगाव मनपा 117 5
10 नंदुरबार 32 2
नाशिक मंडळ एकूण 1618 103
1 पुणे 360 7
2 पुणे मनपा 5319 260
3 पिंपरी-चिंचवड मनपा 317 7
4 सोलापूर 24 2
5 सोलापूर मनपा 599 40
6 सातारा 314 5
पुणे मंडळ एकूण 6933 321
1 कोल्हापूर 244 1
2 कोल्हापूर मनपा 23 0
3 सांगली 72 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 11 1
5 सिंधुदुर्ग 10 0
6 रत्नागिरी 167 4
कोल्हापूर मंडळ एकूण 527 6
1 औरंगाबाद 26 0
2 औरंगाबाद मनपा 1263 48
3 जालना 63 0
4 हिंगोली 132 0
5 परभणी 18 1
6 परभणी मनपा 6 0
औरंगाबाद मंडळ एकूण 1508 49
1 लातूर 74 3
2 लातूर मनपा 8 0
3 उस्मानाबाद 37 0
5 बीड 32 0
6 नांदेड 15 0
7 नांदेड मनपा 83 5
लातूर मंडळ एकूण 249 8
1 अकोला 36 2
2 अकोला मनपा 384 15
3 अमरावती 15 2
4 अमवरावती मनपा 167 12
5 यवतमाळ 115 0
6 बुलढाणा 41 3
7 वाशीम 8 0
अकोला मंडळ एकूण 766 34
1 नागपूर 7 0
2 नागपूर मनपा 468 7
3 वर्धा 6 1
4 भंडारा  14 0
5 गोंदिया 43 0
6 चंद्रपूर 15 0
7 चंद्रपूर मनपा 9 0
8 गडचिरोली 15 0
नागपूर मंडळ एकूण 577 8
1 इतर राज्य 51 12
एकूण 52,667 1695

ताज्या अपडेटनुसार सद्य घडीला देशात कोरोनाचे एकूण 1,38,845 रुग्ण आढळले आहेत, यामध्ये 77,103 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असुन त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर आजपर्यंत एकुण 4,021 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. दुसरीकडे एकूण 57,721 जणांनी कोरोनाच्या जीवघेण्या विषाणूंवर मात केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)


Share Us