Pimpri Chinchwad: वेडा म्हणून चिडवण्यावरून तरुणाची हत्या, पिंपरी-चिंचवड येथील घटना

ही घटना पिंपरीतील (Pimpri Chinchwad) डीलक्स चौक परिसरात घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Crime | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

वेडा म्हणून चिवडण्यावरून एका 25 वर्षीय तरूणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पिंपरीतील (Pimpri Chinchwad) डीलक्स चौक परिसरात घडली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तर, इतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वेडा म्हणून चिडवल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या संबंधित तरूणाला आरोपींनी बेदम मारहाण केली. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. मात्र, तीन दिवसानंतर उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

मनोज राजू कसबे असे मृत तरुणाचे नाव आहे. मनोज हा पिंपरी तील डिलक्स परिसरात राहायला होता. मात्र, याच परिसरातील राहणारे आरोपी त्याला वेडा म्हणून चिडवायचे. ‘मी वेडा नाही’ असे मनोज वारंवार आरोपींना सांगून देखील ते सुधारत नव्हते. या सततच्या त्रासाला कंटाळून मनोज आरोपींना जाब विचारण्यासाठी गेला. त्यावेळी आरोपींना त्याला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या मनोजला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तीन दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. हे देखील वाचा- Mumbai Girl Raped in Udaipur: ऑनलाईन झालेली मैत्री महागात पडली; मुंबईच्या महिलेला उदयपुरला बोलावून शिक्षकाचा बलात्कार, ड्रिंक मध्ये मिसळला अंमली पदार्थ

याप्रकरणी पुष्पा राजू कसबे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सचिन निकाळजे, शौकत समीर शेख, चिम्या उर्फ सुरेश निकाळजे, मनोज अर्जुन जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भूषण डुलगल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर, इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पुण्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अधिक प्रयत्न करीत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif