Mumbai Thane Rain Update: मुंंबई, ठाणे, नवी मुंंबई मध्ये आज पावसाची विश्रांंती, संध्याकाळी बरसतील हलक्या सरी- IMD
होसाळीकर (K.S.Hosalikar) यांंच्या माहितीनुसार आज मुंंबई, ठाणे, नवी मुंंबई मध्ये संध्याकाळी काही आयसोलेटेड भागात पावसाच्या सरी बरसतील मात्र दिवसभर सलग पाऊस राहणार नाही.
Mumbai Rain Update Today: मुंंबई मध्ये कालच्या दिवसात पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळंं काही जलमय झालंं होतं. मुंंबई सहितच उपनगरात तसेच लागुन असलेल्या ठाणे (Thane), नवी मुंंबई (Navi Mumbai) भागात सुद्धा संध्याकाळी तुफान पाऊस झाला होता, आज सकाळी मात्र या ठिकाणी उजाडलेलं दिसत आहे. आयएमडीचे (IMD) उपमहासंचालक के.एस. होसाळीकर (K.S.Hosalikar) यांंच्या माहितीनुसार आज संध्याकाळी काही आयसोलेटेड भागात पावसाच्या सरी बरसतील मात्र सलग पाऊस राहणार नाही. त्यामुळे दोन दिवसांंपासुन पावसाने वैतागलेल्या नागरिकांंना आज काहीसा ब्रेक मिळणार आहे. काल पावसामुळे कोलमडून पडलेली मुंंबई लोकल (Mumbai Local) सेवा सुद्धा आज पुर्ववत झाली आहे. Pravin Darekar Criticizes Shiv Sena: शिवसेना दुर्लक्ष करते म्हणून थोडासा पाऊस पडला तरी, मुंबई पाण्याखाली जाते- प्रविण दरेकर
काल मुंंबईत झालेला पाऊस हा विक्रमी होता, एका आकडेवारीनुसार 23 सप्टेंबर 1981 रोजी मुंबईत विक्रमी 318.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल 39 वर्षांनी काल (23 सप्टेंबर 2020) 286.4 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली.
K. S . Hosalikar ट्विट
दरम्यान, पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दोन दिवसांंपासून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी तर या पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. आता मात्र सर्व परिस्थिती हळुहळु नियंंत्रणाखाली येत आहे.