Palghar Lynching: पालघर साधू हत्याकांडप्रकरणी आणखी 24 जणांना अटक; 19 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

एप्रिल महिन्यात पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी दोन साधूसह त्याच्या ड्रायव्हरची जमावाकडून हत्या आल्याची घटना घडली होती.

Palghar Lynching: पालघर साधू हत्याकांडप्रकरणी आणखी 24 जणांना अटक; 19 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Arrested (Photo Credits: Facebook)

Palghar Lynching: पालघरमधील गडचिंचले गावात झालेल्या दोन साधूंच्या हत्येप्रकरणी आणखी 24 जणांना अटक करण्यात आली आहे. यात पाच अल्पवयीन मुलांचादेखील समावेश आहे. या मुलांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तसेच 19 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने 12 हजार पानांची दोन वेगवेगळे आरोपपत्र दाखल केले आहेत. यात 250 हून अधिक जणांना आरोपी करण्यात आलं आहे. अफवेला बळी पडल्यामुळे हा सर्व प्रकार घडला होता.

दरम्यान, या हिंसाचारासाठी आतापर्यंत 248 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी 105 जणांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच या प्रकरणात आतापर्यंत 15 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मंगळवारी अटक करण्यात आलेल्यांना आरोपींना बुधवारी स्थानिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना यातील 19 जणांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचे वकील अमृत आधिकारी यांनी सांगितले. (हेही वाचा - Palghar Mob Lynching प्रकरणी 8 तासांत 101 जण ताब्यात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसिद्ध केली आरोपींची यादी)

मंगळवारी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या मुलांना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील बाल न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना रिमांड होममध्ये पाठविण्यात आलं आहे.

सुरुवातीला पालघर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविण्यात आली होती. दरम्यान, 16 एप्रिल रोजी गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकांची हत्या केली होती.

(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2020 12:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).