Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी, पाहा आजचे ताजे अपडेट्स

महाराष्ट्रातील Coronavirus रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

देशात दिवसागणिक कोरोना (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या वाढत चालली असून सद्य स्थितीत देशात कोरोनाचे एकूण 1,25,101 रुग्ण आढळले आहेत. यात 69,597 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर महाराष्ट्रात (Maharashtra) आतापर्यंत एकूण 44,582 रुग्ण आढळले असून आतापर्यंत एकूण 12 हजार 583 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 30,474 रुग्ण उपचार घेत असल्याची माहीी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. देशात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसह बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आशेचा किरण निर्माण झाला आहे.

राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत (Mumbai) असून गेल्या 24 तासांत 1751 रुग्ण आढळले असून रुग्णांची एकूण संख्या 27,068 वर पोहोचली आहे. दरम्यान, कोरोनाची लक्षणे दिसूनही भीती व गैरसमजापोटी अनेक रुग्ण उपचारासाठी पुढे येत नसल्याचे निदर्शनास आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. अशा व्यक्ती शेवटच्या क्षणाला दवाखान्यात दाखल झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे कठीण होते. मात्र 100 कोरोना रुग्णांपैकी 97 रुग्ण होतात बरे, हेही लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, ज्यामुळे कोरोनाची लक्षणे जाणवल्यास लोक स्वतःहून उपचारासाठी पुढे येतील.

महाराष्ट्रातील Coronavirus रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 27,251 909
2 ठाणे 366 4
3 ठाणे मनपा 2234 33
4 नवी मुंबई मनपा 1776 29
5 कल्याण डोंबिवली मनपा 727 7
6 उल्हासनगर मनपा 144 3
7 भिवंडी निजामपूर मनपा 82 3
8 मीरा भाईंदर 388 4
9 पालघर 107 3
10 वसई विरार मनपा 451 14
11 रायगड 299 5
12 पनवेल मनपा 282 12
ठाणे मंडळ एकूण 34,107 1027
1 नाशिक 115 0
2 नाशिक मनपा 93 3
3 मालेगाव मनपा 710 44
4 अहमदनगर 49 5
5 अहमदनगर मनपा 22 0
6 धुळे 17 3
7 धुळे मनपा 80 6
8 जळगाव 286 36
9 जळगाव मनपा 109 5
10 नंदुरबार 32 2
नाशिक मंडळ एकूण 1513 103
1 पुणे 283 5
2 पुणे मनपा 4499 231
3 पिंपरी-चिंचवड मनपा 211 7
4 सोलापूर 10 1
5 सोलापूर मनपा 522 32
6 सातारा 204 4
पुणे मंडळ एकूण 5729 280
1 कोल्हापूर 175 1
2 कोल्हापूर मनपा 20 0
3 सांगली 62 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 9 1
5 सिंधुदुर्ग 10 0
6 रत्नागिरी 135 3
कोल्हापूर मंडळ एकूण 411 5
1 औरंगाबाद 22 0
2 औरंगाबाद मनपा 1165 42
3 जालना 46 0
4 हिंगोली 112 0
5 परभणी 17 1
6 परभणी मनपा 5 0
औरंगाबाद मंडळ एकूण 1367 43
1 लातूर 58 2
2 लातूर मनपा 3 0
3 उस्मानाबाद 26 0
5 बीड 26 0
6 नांदेड 15 0
7 नांदेड मनपा 83 4
लातूर मंडळ एकूण 211 6
1 अकोला 31 2
2 अकोला मनपा 336 15
3 अमरावती 9 2
4 अमवरावती मनपा 136 12
5 यवतमाळ 113 0
6 बुलढाणा 39 3
7 वाशीम 8 0
अकोला मंडळ एकूण 672 34
1 नागपूर 3 0
2 नागपूर मनपा 457 7
3 वर्धा 3 1
4 भंडारा 9 0
5 गोंदिया 28 0
6 चंद्रपूर 8 0
7 चंद्रपूर मनपा 9 0
8 गडचिरोली 9 0
नागपूर मंडळ एकूण 524 8
1 इतर राज्य 48 11
एकूण 44,582 1517

भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून या राज्यात 44,582 रुग्ण आढळले आहे. तर एकूण 1517 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यापाठोपाठ तमिळनाडू, गुजरात, नवी दिल्लीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now