Woman Dies By Suicide: लग्न करण्यास नकार दिल्याने 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या; प्रियकरावर गुन्हा दाखल
22 वर्षीय शर्मिन रॉड्रिक्स ने 23 मार्च रोजी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. तिने तिच्या राहत्या घरी छताच्या पंख्याला दुपट्ट्याने गळफास घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मृत तरुणीच्या आईने समयविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
Woman Dies By Suicide: मुंबईतून अत्यंत धक्कादायक घटना समोर येत आहे. लग्न करण्यास नकार दिल्याने 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या (Suicide) केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी (Amboli police) 24 वर्षीय समय दळवी याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला आहे. 22 वर्षीय शर्मिन रॉड्रिक्स ने 23 मार्च रोजी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. तिने तिच्या राहत्या घरी छताच्या पंख्याला दुपट्ट्याने गळफास घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मृत तरुणीच्या आईने समयविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
शर्मिन आणि समय हे रिलेशनशिपमध्ये राहत होते. परंतु त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तरुणीच्या आईने आरोप केला आहे की, या रिलेशनशिपमुळे शर्मिनने दोन वेळा गर्भपात केला होता. तिने असेही म्हटले आहे की समय दारूचे व्यसन करत होता आणि दोघांमधील सततच्या वादांमुळे तिच्या मुलीने हे कठोर पाऊल उचलले. पोलिसांनी तरुणीच्या प्रियकराविरुद्ध 2 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा -Mumbai: आईने अभ्यास करायला सांगितल्याने 14 वर्षांच्या मुलाने केली आत्महत्या; भांडूपमधील घटना)
मृत शर्मिन ही तिच्या आई आणि बहिणीसह अंधेरी पश्चिम येथे राहत होती. बारावी पूर्ण केल्यानंतर, तिने कॉलेज सोडले आणि एका लॉ फर्ममध्ये काम करायला सुरुवात केली. तथापि, तिच्या मृत्यूच्या तीन महिने आधी तिने नोकरी सोडली. दरम्यान, ती तिच्या आईला मदत करत होती, जी मेस चालवते. त्याच परिसरात राहणारी शर्मीन आणि समय यांची मैत्री झाली आणि सुमारे चार वर्षांपूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यांच्या नात्यादरम्यान, शर्मीन अनेकदा समयला आर्थिक मदत करत असे. (हेही वाचा: Chennai: कामाच्या दबावामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या आत्महत्या, चैन्नई येथील घटना)
तरुणीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे की, मद्यपी असलेला समय वारंवार शर्मीनशी वाद घालत असे. पालक गमावल्यानंतर, तो त्याची मावशी नेहा सावंत यांच्याकडे राहत असे. शर्मीनने त्याला त्याच्या मावशीशी त्यांच्या लग्नाबद्दल बोलण्यास सांगितले होते, परंतु त्याने तसे केले नाही. सुमारे एक वर्षापूर्वी, शर्मीनची आई त्याच्या मावशीच्या घरी या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आली होती, परंतु त्याच्या मावशीने या लग्नास नकार दिला. त्यानंतर समयने तो त्याच्या मावशीच्या संमतीनेच पुढे जाऊ शकतो, असा दावा करत त्याने लग्नास नकार दिला.
दरम्यान, तो शर्मीनला भेटत राहिला, तिच्याकडून पैसे मागत राहिला. तो तिच्यावर शारीरिक हल्ला करत असे. त्याने शर्मीनला गर्भपात करण्यास भाग पाडले होते. तथापी, 23 मार्च रोजी शर्मीन घरी एकटी होती. तिची आई आणि बहीण संध्याकाळी 5:45 च्या सुमारास चर्चमधून परतले तेव्हा त्यांना दरवाजा बंद आढळला. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजाऱ्यांकडून दरवाजा तोडला. यावेळी शर्मीन दुपट्ट्यासह छताच्या पंख्याला लटकलेली आढळली. तिला तातडीने जुहू येथील कूपर रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नंतर तिच्या मोबाईल फोनवर समयला उद्देशून एक व्हिडिओ संदेश सापडला. यानंतर, तिच्या आईने तक्रार दाखल केली आणि अंबोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
Suicide Prevention and Mental Health Helpline Numbers: Tele Manas (Ministry of Health) – 14416 or 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; Peak Mind – 080-456 87786; Vandrevala Foundation – 9999 666 555; Arpita Suicide Prevention Helpline – 080-23655557; iCALL – 022-25521111 and 9152987821; COOJ Mental Health Foundation (COOJ) – 0832-2252525.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)