धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 21 वर्षीय तरुणीचा रिक्षात विनयभंग; स्वत:चा बचाव करण्यासाठी मुलीने मारली उडी
ज्याचा परिणाम तिने धावत्या रिक्षातून उडी मारली. मुलगी थोडक्यात बचावली असून तिच्यापाठोपाठ तिचा विनयभंग करणा-याने तरुणाने देखील रिक्षातून उडी मारून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
हिंगणघाट जळीत कांडातील पीडित शिक्षिकेच्या मृत्यूस 1 दिवसही उलटला नसून माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उल्हासनगर (Ulhasnagar) परिसरात घडली. क्लास ला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 21 वर्षीय तरुणीचा रिक्षात विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्याचा परिणाम तिने धावत्या रिक्षातून उडी मारली. मुलगी थोडक्यात बचावली असून तिच्यापाठोपाठ तिचा विनयभंग करणा-याने तरुणाने देखील रिक्षातून उडी मारून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यावरील लोक जमा झाल्याने त्याने तेथून पळ काढला.
देशात महिलांवर होणारे अत्याचार दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हिंगणघाट, औरंगाबाद मधील घटना ताजी असतानाच उल्हासनगर मध्ये तरुणीचा धावत्या रिक्षात विनयभंग केल्याची घटना ऐकायला मिळत आहे. 21 वर्षीय तरुणी कॅम्प नंबर एक येथील धुनिचन कॉलेज रस्त्यावरून क्लासक्लाला जाण्यासाठी रिक्षात बसून उल्हास स्थानकाकडे जात होती. त्यावेळी त्या रिक्षात आधीच 20 ते 25 वर्षीय तरुण तोंडाला रुमाल बांधून बसला होता. रिक्षा काही अंतरावर जाताच रिक्षातील तरुणाने त्या विद्यार्थिनीला छेडण्याचा प्रयत्न सुरू केला.
हेदेखील वाचा- हिंगणघाट प्रकरण: आरोपीला लवकरात-लवकर फासावर लटकवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
त्यामुळे घाबरलेल्या त्या विद्यार्थिनीने रिक्षाचालकाला रिक्षा थांबविण्यास सांगितली. मात्र तो रिक्षाचालकही त्या तरुणासोबत असल्याने त्यानेही रिक्षा न थांबवता वेग वाढवला. या घटनेने रिक्षातील विद्यार्थिनी खूपच घाबरली असताना तिने त्यांच्या तावडीतून आपली सुटका करण्यासाठी धावत्या रिक्षातून उडी मारली. मात्र त्या तरुणीच्या पाठोपाठ रिक्षातील त्या तरुणानेही रिक्षातून उडी मारून त्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला. हा प्रकार पाहून रस्त्यावरील नागरिकांनी धाव घेताच तरुणाने रिक्षात बसून पळ काढला.
याप्रकरणी रिक्षाचालकासह त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.