धारावीत आज 21 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; एकूण कोरोबाधित रुग्णांची संख्या 2089 वर पोहोचली
त्यामुळे धारावीतील एकूण कोरोबाधित रुग्णांची संख्या 2089 वर पोहोचली आहे. आतापर्यंत धारावीत 77 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
धारावीत (Dharavi) आज 21 नव्या कोरोना रुग्णांची (Corona Patient) नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोबाधित रुग्णांची संख्या 2089 वर पोहोचली आहे. आतापर्यंत धारावीत 77 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबईमध्ये आढळून येत आहे. मुंबईतील दादर, वरळी, धारावी, भागात कोरोनाचे हॉटस्पॉट ठिकाणं आहेत. या भागातून दररोज अनेक रुग्णांना कोरोनाचे संसर्ग होतं आहे. यातील धारावी परिसरात कोरोना संक्रमणाचे प्रमाण जास्त आहे. (हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनाही मिळणार लोकलची सुविधा; मुख्य सचिव अजोय मेहता यांचे आश्वासन))
दरम्यान, मुंबई सोमवारी 1066 कोविड-19 रुग्णांची नोंड झाली. तर 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या आता 59201 पेक्षा जास्त झाली आहे. यातील 30125 रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या 26828 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर 2248 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
याशिवाय सोमवारी महाराष्ट्रात 2 हजार 786 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 178 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 10 हजार 744 इतकी झाली आहे. यातील 4 हजार 128 जणांचा मृत्यू झाला असून 56 हजार 49 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.