Coronavirus Cases In Pune: गेल्या 24 तासात पुण्यात 205 नवे कोरोना रुग्ण; जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 56,621 वर पोहोचली
गेल्या 24 तासात पुण्यात (Pune) 205 नवे कोरोना रुग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 56,621 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात 1हजार 442 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पुणे जि्ल्ह्याचे आरोग्य अधिकारी भगवान पवार (Dr Bhagawan Pawar) यांनी माहिती दिली आहे.
Coronavirus Cases In Pune: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात पुण्यात (Pune) 205 नवे कोरोना रुग्ण (Corona Patient) आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 56,621 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात 1हजार 442 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात पुणे जि्ल्ह्याचे आरोग्य अधिकारी भगवान पवार (Dr Bhagawan Pawar) यांनी माहिती दिली आहे.
मंगळवारी शहरात नव्याने 1 हजार 512 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. काल दिवसभरात 6 हजार पेक्षा जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मंगळवारी शहरातील 805 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. (हेही वाचा - नालासोपाऱ्यात एसटी स्टॅण्ड बंद केल्याने प्रवाशांची रेल्वे स्थानकावर गर्दी; लोकलने प्रवास करण्याची केली मागणी)
दरम्यान, मंगळवारी आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात तब्बल 8 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 27 हजार 31 इतकी झाली आहे. आतापर्यंत 1 लाख 82 हजार 217 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच राज्यात सध्या 1 लाख 32 हजार 236 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.