Coronavirus Cases In State Prison Department: महाराष्ट्रातील कारागृहामधील 2,011 कैदी आणि 416 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण

Coronavirus Cases In State Prison Department: राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी महाराष्ट्रात 21,907 कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या 11,88,015 इतकी झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक कोरोना योध्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

प्रतिकात्मक फोटो (PC - PTI)

महाराष्ट्रातील तुरूगांमध्ये 2,011 कैदी आणि 416 कारागृतील कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तसेच कोरोनामुळे 6 कैदी आणि 4 जेल कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात राज्य कारागृह विभागाने माहिती दिली आहे. (हेही वाचा - Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रामध्ये आज कोरोना विषाणूच्या 21,907 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 11,88,015 वर)

दरम्यान, राज्यात शनिवारी 434 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली. आतापर्यंत राज्यातील 21235 कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. याशिवाय 208 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यापूर्वी येरवडा कारागृहातून 5 कोरोना पॉझिटिव्ह कैदी फरार झाले होते. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now