New Mumbai: खारघरमध्ये क्रेनने चिरडून 20 वर्षीय मजुराचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
New Mumbai: नवी मुंबई टाउनशिपमध्ये केबल (Cable) टाकण्यासाठी आलेल्या एका 20 वर्षीय मजुराचा क्रेनने चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खारघर (Kharghar) परिसरात शनिवारी सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली. खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी हा मजूर (Labourer) केबल ड्रम ढकलत असताना तो क्रेनजवळ पडला.
त्यावेळी एका क्रेन ऑपरेटरने मशीन पुढे नेल्याने मजुराचा चिरडून मृत्यू झाला. यासंदर्भात खारघर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. सुनील नरसिमा तांगडी असे मृत तरुणाचे नाव असून तो नवी मुंबईतील बेलापूर परिसरातील रहिवासी आहे. (हेही वाचा - Solapur Rape Case: लग्नाचा आमिष दाखवून अभिनेत्रीवर बलात्कार, आरोपीवर गुन्हा दाखल, सोलापूरातील घटना)
क्रेन चालकावर गुन्हा दाखल -
सुनील नरसिमा तांगडी यांच्या भावाच्या तक्रारीच्या आधारे, क्रेन ऑपरेटर विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 304A (निष्काळजीपणामुळे मृत्यू), 279 (रॅश ड्रायव्हिंग), 337 (जीव धोक्यात आणणाऱ्या कृत्याने दुखापत करणे), 338 (जीव धोक्यात आणणाऱ्या कृतीमुळे दुखापत) नुसार आणि आणि मोटार वाहन कायद्यातील तरतुदीतील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ((हेही वाचा-महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याप्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीला अटक, मुंबईतील घटना)
दरम्यान, तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच मृत सुनीलच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.