Mumbai: मुलुंडमध्ये 19 वर्षीय पेंटरचा 20 व्या मजल्यावरून पडून मृत्यू; कंत्राटदारांवर गुन्हा दाखल

निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Mumbai: मुलुंड (Mulund) च्या टाटा कॉलनीत (Tata Colony) एका बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या 19 वर्षीय पेंटर (Painter)चा शुक्रवारी दुपारी 20 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. अजीजूर अतूर शेख असे मृताचे नाव असून तो पश्चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी आहे. निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोन कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुलुंड पूर्व येथील आशीर्वाद हॉस्पिटलने पीडितेच्या प्रकृतीची माहिती नवघर पोलिसांना दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. शेख यांचा जवाब नोंदवण्यासाठी एक पथक रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र त्यावेळी तो बेशुद्ध होता. डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले की, शेखच्या छातीवर आणि पाठीवर अंतर्गत दुखापतींशिवाय गंभीर जखमा झाल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. (वाचा - Pune Crime: पुण्यात घरगुती वादातून पतीने पत्नी आणि मुलीला संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर)

दरम्यान, अब्दुल शेख (37) या पीडितेच्या मित्राने सांगितले की, ते आणखी सात मजुरांसह पूर्वरंग सोसायटी, टाटा कॉलनी येथे काम करत होते. काम संपल्यानंतर हा अपघात झाल्याचे अब्दुल यांनी सांगितले. अजीजूरने बांबूच्या रॉडवर पाय ठेवला आणि तो घसरला. त्याला प्रथम वीर सावरकर रूग्णालयात नेण्यात आले. परंतु, तेथून त्याला आशिर्वाद रूग्णालयात हलविण्यात आले. (हेही वाचा - UP Shocker: अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत कोचिंग सेंटरच्या संचालकाचे प्रेमसंबंध; मुलगी गर्भवती राहिल्यानंतर केली हत्या)

अब्दुल यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांचे कंत्राटदार - राजेश मुळीक (40) आणि हाजीकुल शेख (24) यांनी मजुरांना सुरक्षा दोरी, हेल्मेट किंवा बेल्ट दिलेले नाहीत. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा त्यांना असे आढळले की मचान सैल बांधलेले होते आणि तेथे सुरक्षा जाळीही लावलेली नव्हती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif