धारावीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1849 वर पोहोचली; आज 19 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

धारावीत आज 19 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत धारावीत 71 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे. धारावीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

धारावीतील (Dharavi) कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1849 वर पोहोचली आहे. धारावीत आज 19 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत धारावीत 71 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे. धारावीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या दोन महिन्यापासून धारावी हे ठिकाण कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. त्यामुळे या ठिकाणी दररोज नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. धारावी हा दाट वस्तीचा भाग आहे. परिणामी या भागात नागरिकांना कोरोनाचे संक्रमण होण्याचे प्रमाण जास्त आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज 2560 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 74860 वर पोहोचली आहे. (वाचा - Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे विजेचा खांब अंगावर कोसळल्याने 58 वर्षीय वक्तीचा मृत्यू)

आज दिवसभरात मुंबई तसेच कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडले. तसेच काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून पडले. आधीच कोरोना संकटाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना आज चक्रीवादळाचा तडाखा बसला.

दरम्यान, मुंबईत मंगळवारी 1 हजार 109 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 49 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 41 हजार 986 वर पोहोचली आहे. यापैकी 1 हजार 368 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकडा वाढत आहे. याशिवाय देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 लाखाहून अधिक झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.