COVID19 Cases In Pune: पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ; जिल्ह्यात आज 1 हजार 838 रुग्णांची नोंद, 18 जणांचा मृत्यू
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबईनंतर पुण्यात (Pune) आढळून आले आहेत. पुण्यात आज 1 हजार 838 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजार 446 वर पोहचली आहे. यापैकी 935 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता नागरिकांच्या मनात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच धारावी परिसर अधिक मोठा असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता जीवापाड प्रयत्न करत आहेत. हे देखील वाचा- नांदेडमध्ये आज 94 नवे कोरोनाबाधित रुग्ण; जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 869 वर पोहचली
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आज 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात आज 8 हजार 348 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 144 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 937 वर पोहचली आहे. यापैकी 11 हजार 596 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 65 हजार 663 जणांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.