Lakshya 84 Days Mission: धक्कादायक! नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 3 महिन्यांत 179 मुलांचा मृत्यू; मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली 'लक्ष्य 84 दिवस' मिशनची घोषणा
या मुलांच्या मृत्यूला अनेक घटक कारणीभूत आहेत. जन्मत: कमी वजन, श्वासोच्छवासाचे आजार, सेप्सिस आणि श्वासोच्छवासाचे आजार या प्राथमिक कारणांमुळे चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे यापैकी 70% मृत्यूंमध्ये 0-28 दिवसांच्या मुलांचा समावेश होता.
Lakshya 84 Days Mission: नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (Nandurbar Civil Hospital) बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल 179 मुलांनी आपला जीव गमावल्याची नोंद आहे. नंदुरबारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी एम सावन कुमार (M Sawan Kumar) यांनी दिलेल्या माहितीवरून या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुलैमध्ये, हॉस्पिटलमध्ये 75 बालमृत्यूची नोंद झाली. ऑगस्टमध्ये ही संख्या 86 वर पोहोचली आणि सप्टेंबरमध्ये आतापर्यंत 18 अतिरिक्त मृत्यूची नोंद झाली आहे.
कुमार यांच्या मते, या मुलांच्या मृत्यूला अनेक घटक कारणीभूत आहेत. जन्मत: कमी वजन, श्वासोच्छवासाचे आजार, सेप्सिस आणि श्वासोच्छवासाचे आजार या प्राथमिक कारणांमुळे चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे यापैकी 70% मृत्यूंमध्ये 0-28 दिवसांच्या मुलांचा समावेश होता. (हेही वाचा- Dombivli Building Collapses: डोंबिवली येथे तीन मजली इमारत कोसळून दोन ठार, एक जखमी)
#WATCH | Nandurbar, Maharashtra | 179 children died in the civil hospital in the last three months.
Nandurbar CMO M Sawan Kumar says, "Looking at the data 75 deaths in July, 86 deaths in August and 18 deaths in September till now happened in Nandurbar district. Major reasons… pic.twitter.com/a0HFiCKnuu
— ANI (@ANI) September 16, 2023
कुमार यांनी असेही नमूद केले की, या प्रदेशातील अनेक महिलांना सिकलसेल रोगाचा त्रास होता. ज्यामुळे बाळाच्या जन्मादरम्यान अडचणी आल्या. या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि लहान मुलांचे जीव वाचवण्याची गरज ओळखून, नंदुरबारमधील अधिकाऱ्यांनी 'मिशन लक्ष्य 84 दिवस' या नावाने एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. बालमृत्यूची मूळ कारणे हाताळणे, आरोग्य सेवा सुधारणे आणि अर्भकांना जगण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 16, 2023 12:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

