Coronavirus Cases In Mumbai: मुंबईत आज 1498 नवे कोरोना रुग्ण, तर 56 जणांचा मृत्यू; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 97,751 वर पोहचली

आज मुंबई शहरामध्ये 1498 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून दिवसभरात 56 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 97,751 इतकी झाली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची (Corona Positive Patient) संख्या मुंबईमध्ये (Mumbai) आढळून येत आहे. आज मुंबई शहरामध्ये 1498 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून दिवसभरात 56 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 97,751 इतकी झाली आहे.

आतापर्यंत मुंबईतील 68 हजार 537 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सध्या मुंबईत 23 हजार 694 कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 5 हजार 520 कोरोना रुग्णांची कोरोना विरुद्धची लढाई अपयशी ठरली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे. (हेही वाचा -कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत)

दरम्यान, आज महाराष्ट्रात 8 हजार 641 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 266 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1 लाख 14 हजार 648 इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत 11 हजार 194 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याशिवाय आतापर्यंत 1 लाख 58 हजार 140 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif