COVID-19 Cases In Maharashtra: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्यात 129 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; JN.1 प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली 10 वर

1 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रात 137 कोविड-19 मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 70.80 टक्के मृत्यू हे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये झाले आहेत, 84 टक्के मृत व्यक्तींना कॉमोरबिडीटीज होते, तर 16 टक्के लोकांमध्ये कोणतेही आजार नव्हते.

COVID-19 Cases In Maharashtra: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्यात 129 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; JN.1 प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली 10 वर
Coronavirus (Photo Credit - ANI/Twitter)

COVID-19 Cases In Maharashtra: राज्यात कोरोना (Coronavirus) पुन्हा एकदा डोक वर काढू लागला आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात कोविड-19 चे तब्बल 129 नवीन रुग्ण आढळले. JN.1 प्रकाराने संक्रमित (JN.1 Variant) रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 80,23,487 कोविड-19 रुग्णांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहेत. राज्यातील पुनर्प्राप्तीचा दर 98.18 टक्के आहे, तर राज्यातील मृत्यूचे प्रमाण 1.81 टक्के आहे. आजपर्यंत 8,76,06,207 प्रयोगशाळेतील नमुन्यांपैकी 81,72,533 चाचण्या पॉझिटिव्ह (9.33 टक्के) आढळल्या आहेत.

दरम्यान, 1 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रात 137 कोविड-19 मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 70.80 टक्के मृत्यू हे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये झाले आहेत, 84 टक्के मृत व्यक्तींना कॉमोरबिडीटीज होते, तर 16 टक्के लोकांमध्ये कोणतेही आजार नव्हते. (हेही वाचा - Covid's JN.1 Variant in Maharashtra: 'कोरोनाचा ‘जेएन-1’ हा नवीन उपप्रकार घातक नाही', मात्र कोविड अनुरूप नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे राज्य सरकारचे आवाहन)

भारतात COVID-19 JN.1 प्रकाराची 145 प्रकरणे -

तथापी, भारतात 28 डिसेंबरपर्यंत कोविड-19 सबवेरिएंट JN.1 चे एकूण 145 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 28 डिसेंबरपर्यंत JN.1 प्रकाराची एकूण 145 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हे नमुने 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2023 दरम्यान गोळा करण्यात आले होते. केरळमध्ये जेएन.1 प्रकारची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. राज्यात JN.1 सबवेरियंटची 41 प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी बहुतांश होम आयसोलेटेड होते. नवीन वर्षाच्या आधी, केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारे नवीन Omicron Subvariant JN.1 वर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ताज्या अपडेटनुसार, भारतात 797 नवीन COVID-19 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि सक्रिय प्रकरणांची संख्या 4,000 इतकी आहे.  (हेही वाचा - Genetic Diseases: देशातील 90 लाख लोकांना जनुकीय आजारांचा धोका; जीनोम अभ्यासानंतर शास्त्रज्ञांचा दावा)

COVID-19 JN.1 व्हेरिएंट -

16 डिसेंबरपर्यंत, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 41 देशांतून कोविड-19 JN.1 चे 7,344 प्रकरणे नोंदवली आहेत. दरम्यान, दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने बुधवारी कोविड -19 संशयित किंवा सकारात्मक प्रकरणांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2023 08:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).