गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 2933 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 77,793 वर पोहोचली
त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 77,793 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 2710 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे.
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 2933 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 77,793 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 2710 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने (State Health Department) माहिती दिली आहे.
देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, सातारा, आदी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. (हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; राज्यातील मृतांच्या वाढत्या संख्येवर केली चिंता व्यक्त)
दरम्यान, बुधवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात 8,909 नव्या रुग्णांची भर पडली. तर 217 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 207,615 वर पोहचला आहे. यातील 100,303 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 101,497 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार आहेत. आतापर्यंत भारतात 5,815 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.