Representational Image | (Photo Credits: File Photo)

राज्यातील पालघर (Palghar) जिल्ह्यात एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (7 ऑक्टोबर) घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा तपास सुरु केला होता. दरम्यान, आरोपीला पकड्यात पोलिसांना यश आले आहे. हा आरोपी कॉन्ट्रॅक्टर आहे. घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत आरोपीने मुलीवर बलात्कार केला आणि तिथून पळ काढला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (फेसबुक मित्राचा तरुणीवर बलात्कार, अश्लील चित्रफीत बनवून शरीरसंबंधासाठी दबाव; नागपूर येथील घटना)

पालघर जिल्ह्यातील मोखाडा (Mokhada) परिसरातील अल्पवयीन मुलीच्या घरात कोणीच नसल्याचे पाहुन आरोपी घरात घुसला आणि मुलीवर जबरदस्ती करु लागला. दरम्यान, पीडित मुलीचा भाऊ घरी आला. त्याने आरोपीला रंगेहाथ पकडलं आणि मदतीसाठी आरडा-ओरड केला. मात्र आरोपीने पीडितेच्या भावाला ढकलून दिलं आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करताच 72 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली.

ANI Tweet:

दरम्यान, काही दिवासांपूर्वी पालघरमध्ये 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा बलात्कार झालेल्या या पीडितेने अखेर आत्महत्या करुन आपले जीवन संपवले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. (पालघर येथे लग्नाचे आमीष दाखवून एका 19 वर्षीय तरुणीचा बलात्कार; पीडिताने गळफास लावून संपवले स्वत:चे जीवन)

उत्तर प्रदेशातील हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना ताजी असतानाच देशाच्या विविध भागांतून बलात्काराच्या अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.