Maharashtra Police: महाराष्ट्रामधील 12 अधिकाऱ्यांसह 52 पोलिस हवालदारांना कोरोना विषाणूची लागण; सर्वात जास्त पोलीस मुंबईमधील

अशा प्रकारे पोलिसांसाठी या विषाणूचा धोका वाढत असताना, महाराष्ट्र पोलिसातील (Maharashtra Police) 12 अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

Maharashtra Police | (PTI photo)

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या वर्षा बंगल्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाल्याची बातमी आली होती. आता रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या ताफ्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. अशा प्रकारे पोलिसांसाठी या विषाणूचा धोका वाढत असताना, महाराष्ट्र पोलिसातील (Maharashtra Police) 12 अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तसेच 52 पोलिस हवालदारही कोरोना विषाणूबाबत संक्रमित आढळले आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्र पोलीसमधील 64 जणांचा या विषाणूचा संसर्ग झाला आहे.

संक्रमित पोलिसांपैकी सर्वात जास्त पोलीस मुंबईतील आहेत. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत एकूण 34 पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे व संक्रमित होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. सध्या लॉकडाऊन चालू आहे अशा काळात याचे कडक पालन व्हावे म्हणून पोलीस प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी घरात राहावे म्हणून पोलीस रस्त्यावर उतरत आहे, अशा वेळी पोलिसांना या विषाणूची लागण होण्याचा धोका वाढला आहे.

याबाबत पोलिसांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) कोरोना व्हायरसने (Coronavirus) संक्रमित झालेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी मदत म्हणून, 1 लाख रुपयांची रक्कम अ‍ॅडव्हान्स देण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशासन) संजीव कुमार सिंघल (Sanjiv Kumar Singhal) यांनी सोमवारी याबाबत आदेश जारी केला. (हेही वाचा: Coronavirus: महाराष्ट्र पोलिसांचा महत्वाचा निर्णय; कोरोना व्हायरस संक्रमित पोलिसांना उपचारांसाठी अ‍ॅडव्हान्समध्ये देणार 1 लाख रुपये)

Maharashtra Corona Update: महाराष्ट्रात ५ हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण; भारतात २० हजाराचा आकडा पार - Watch Video 

आकडेवारीनुसार, 22 मार्च ते 22 एप्रिल पर्यंत लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल आयपीसीच्या कलम 188 अन्वये 62,987 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसेच अलग ठेवण्याच्या उपायांचे उल्लंघन केल्याचे आढळलेल्या व्यक्तींची संख्या 595 आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आज 431 नवीन कोरोना विषाणू प्रकरणांची नोंद झाली आहे आणि 18 मृत्यू नोंदवले गेले आहेत. अशाप्रकारे राज्यात एकूण रुग्णांची संख्या 5649 झाली असून, मृत्यूंची संख्या 269 वर पोहोचली आहे