पुण्यातील बारावी पास महिलेने सँमसंग वेबसाइटमध्ये शोधल्या 2 त्रुटी; कंपनीने दिले 1 हजार डॉलरचे बक्षीस
त्यामुळे सँमसंग कंपनीने या महिलेला 1 हजार डॉलरचे बक्षीस दिले आहे. विजेता पिल्लई, असं या महिलेचं नाव आहे. पिल्लई यांनी सँमसंगच्या वेबसाइटमध्ये दोन बग शोधून काढले आहेत.
पुण्यातील फक्त 12 वी पास असणाऱ्या महिलेने सँमसंग वेबसाइटमध्ये (Samsung Website) शोधल्या 2 त्रुटी शोधल्या आहेत. त्यामुळे सँमसंग कंपनीने या महिलेला 1 हजार डॉलरचे बक्षीस दिले आहे. विजेता पिल्लई, (Vijeta Pillay) असं या महिलेचं नाव आहे. पिल्लई यांनी सँमसंगच्या वेबसाइटमध्ये दोन बग शोधून काढले आहेत. पिल्लई या पुण्यातील एका रिअलइस्टेट कंपनीत काम करतात. विशेष म्हणजे पिल्लई यांनी कोणतेही आयटी शिक्षण घेतले नसून त्यांना फारसी तंत्रज्ञानाची माहिती नाही. परंतु, तरीदेखील त्यांनी सँमसंगच्या 'डिस्पे सोल्यूशन' या साइटमध्ये 2 त्रुटींचा शोध लावला आहे.
दरम्यान, पिल्लई यांनी याबाबतीत माहिती देताना सांगितले की, 'सॅमसंगच्या डिस्प्ले सोल्यूशन वेबसाइटमध्ये कोणताही ओटीपी न टाकता लॉग इन करता येत होते. ही वेबसाइट सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. या त्रुटीमुळे त्यांची सुरक्षित माहिती लीक होण्याची भीती होती. त्यामुळे मी 24 नोव्हेंबरला संपूर्ण प्रोससचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर तो कंपनीला पाठवला. 4 डिसेंबरला मला कंपनीकडून रिप्लाय आला. त्यावेळी त्यांना आपली चूक समजली होती,' असंही पिल्लई यांनी सांगितलं. (हेही वाचा - इन्स्टाग्रामचा वापर करण्याअगोदर नव्या युजर्सना दयावी लागणार 'ही' माहिती)
पिल्लई यांचे काही मित्र आयटी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पिल्लई नेहमी आपल्या मित्र-मैत्रिणींकडून तंत्रज्ञानाची माहिती मिळवत असतात. यातून त्यांना याविषयी आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी हळूहळू तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यास सुरूवात केली. पिल्लई यांनी याअगोदरदेखील फेसबूकमध्येही त्रुटी (बग) शोधल्या आहेत. पिल्लई या 'फेसबुक'च्या वर्कप्लेस'मध्ये त्रुटी शोधणाऱ्या भारतातील पहिल्या महिला आहेत.