पुणे: कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात
कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने (COVID19) धुमाकूळ घातला असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुणे (Pune) येथील बावधनजनळ (Bavdhan) आज (6 जुलै) सायंकाळी घडली आहे. दरम्यान, अनेक रुग्ण जखमी झाले असून उपाचारासाठी त्यांना लवळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही रुग्णवाहिका कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन बालेवाडी भागातील निकमार या क्वारंटाईन सेंटरकडे निघाली असताना रस्त्यात हा अपघात झाला आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूकही काहीकाळ ठप्प झाली होती.
किष्किंधानगर आणि जयभवानीनगरमधील कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन जात असताना बावधन गावाच्या हद्दीत शिवप्रसाद हॉटेलसमोर हा अपघात झाला आहे. रुग्णवाहिका चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समजत आहे. दरम्यान, समोरून चाललेल्या चारचाकी वाहनाला धडक दिल्याने रुग्णवाहिका मुंबई- बेंगलोर महामार्गावर पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- Tata Sons यांच्याकडून राज्यसरकाला 20 रुग्णवाहिका, 100 व्हेंटिलेटर्सह 10 कोटींचा निधी दान केल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती
पीटीआयचे ट्वीट-
महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ पुणे शहरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या जवळपास 30 हजारपर्यंत पोहचली आहे. त्यापैकी 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 13 हजारांपेक्षा जणांनी कोरोनावर मात केली आहे.