Maharashtra Police: महाराष्ट्रातील 1,061 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण; 9 जणांचा मृत्यू
कोरोनाविरुद्ध (Coronavirus) पहिल्या फळीत लढणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. कोरोनाविरुद्ध (Coronavirus) पहिल्या फळीत लढणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील (Maharashtra Police) पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात तब्बल 1 हजार 61 पोलीस कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या 1 हजार 61 पोलिसांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 174 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे पोलीस प्रशासनापुढे कोरोना विषाणूचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
कोरोनाविरुद्ध देशाच्या सुरू असलेल्या युद्धात प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी आदी दिवसरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. आपण घरात सुरक्षित रहावे म्हणून जीव धोक्यात घालून देशभराती पोलीस उन्हातान्हात रस्त्यांवर बंदोबस्तास उभे आहेत. या पोलिसांना देखील करोनाने घेरले असून त्यांचा जीव देखील धोक्यात आल्याचे दिसत आहे. याशिवाय लॉकडाउनच्या काळात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याच्या अनेक घटना आपल्या कानावर पडल्या आहेत. पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी जवळपास 800 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात कोविड 19 चे किती रुग्ण? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील कोरोना व्हायरसची स्थिती
एएनआयचे ट्वीट-
महाराष्ट्रात दिवसेगणिक कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ होत असल्याचे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 27 हजार 524 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 1,019 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 6,059 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.