German Shepherd Attacks On Girl: अंधेरीत जर्मन शेफर्ड कुत्र्याचा 10 वर्षांच्या मुलीवर हल्ला; 2 तास ऑपरेशन करून घालण्यात आले 45 टाके

एकाच कुत्र्याने परिसरातील रहिवाशांवर हल्ला केल्याची ही तिसरी घटना आहे.

Dog Attack | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

German Shepherd Attacks On Girl: मुंबईच्या अंधेरी (Andheri) (पूर्व) एमआयडीसी परिसरातील लोढा एटर्निस सोसायटीतील (Lodha Eternis Society) जर्मन शेफर्ड कुत्र्याने (German Shepherd Dog)10 वर्षांच्या मुलीला चावा घेतला. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर दोन तास ऑपरेशन करण्यात आले असून तिला 45 टाके घालावे लागले. एकाच कुत्र्याने परिसरातील रहिवाशांवर हल्ला केल्याची ही तिसरी घटना आहे.

प्राप्त माहितीनुसार, 27 नोव्हेंबर बिल्डिंगच्या खाली कुत्र्याने मुलीला चावा घेतला. शेजाऱ्यांनी पालक, रुपेश आणि झिंगिंग कुमार यांना हल्ल्याची माहिती दिली. तेव्हा घटनेची तीव्रता स्पष्ट झाली. त्यानंतर मुलीला झालेल्या जखमेवर शस्त्रक्रियेसाठी तात्काळ हिरानंदानी रुग्णालयात नेण्यात आले. (हेही वाचा -Gurugram Shocker: पाळीव कुत्र्याचा शेजाऱ्यावर हल्ला, मालकाने केले दुर्लक्ष, गुन्हा दाखल)

चेतावणी देऊनही वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे निराश झालेल्या कुमार यांनी 30 नोव्हेंबर रोजी कुत्र्यांच्या मालकांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 154 नुसार एफआयआर दाखल केला. सोसायटीचे सचिव गुरप्रीत सिंग उप्पल यांनी कुटुंबाला अधिकृत कारवाई करण्यास प्रोत्साहित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (हेही वाचा - Leopard Attacks Dog In Pune: बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, घरातल्यांची धावपळ; पुणे जिल्ह्यातील शिरुर येथील घटना सीसीटीव्हीत कैद (Watch Video))

दरम्यान, या प्रकरणी मालकाने मुलीच्या कुटुंबियांची माफी मागितली नाही. तसेच प्रति-एफआयआरची धमकीही दिली. उप्पल यांनी निवासी संकुलांमध्ये पाळीव प्राण्यांमुळे सोसायटीतील रहिवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला दोन आंतरशालेय स्पर्धा आणि दोन आठवडे शाळेला मुकावे लागले. पीडित मुलगी ही राज्यस्तरीय तायक्वांदो खेळाडू आहे.