मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर; 'गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी कुटुंब छत्रपती शिवाजी महाराजांना साकडे घालणार'- वैभवी देशमुख
सरपंच संतोष देशमुख यांची सहा महिन्यांपूर्वी हत्या झाली आहे. खंडणीला विरोध केल्याने त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे. त्याचे फोटो, व्हिडिओज समोर आल्यानंतर सारा महाराष्ट्र हळहळला होता. आता या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देणार याकडे सार्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) 352 व्या शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din) सोहळा पार पडणार आहे. राज्यभरातून आज रायगडावर शिवप्रेमी येतात. अशातच आज मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील आले आहे. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि बंधू धनंजय देशमुख आले आहेत. महाराष्ट्रात माझ्या वडिलांची हत्या झाली, जनतेला आम्हांला साथ दिली आता आम्हाला न्यायाची अपेक्षा असल्याचे मत वैभवी देशमुखने व्यक्त केले आहे. शिवरायांच्या काळात जशी शिक्षा देण्याची प्रथा होती तीच प्रथा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी वापरली तर राज्यातील गुन्हे थांबतील असे मत व्यक्त केले आहे. गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी आज देशमुख कुटुंब छत्रपती शिवाजी महाराजांना साकडे घालणार आहे. Shivrajyabhishek Din 2025 Messages In Marathi: शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा Quotes, Facebook Messages, HD Images शेअर करत शिवप्रेमींना द्या शुभेच्छा.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे. पुढील सुनावणी आता 17 जून दिवशी आहे. वाल्मिक कराड हा या प्रकरणामधील मुख्य आरोपी आहे. देशमुख कुटुंबाची आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आहे. केज पोलीस ठाण्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. वाल्मिक कराडने वकिलामार्फत अर्ज करत मकोका अंतर्गत दोषमुक्त करा अशी मागणी केली. सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी तुरुंगात आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2025 09:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

