Shivrajyabhishek Din 2025 Messages In Marathi: शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा Quotes, Facebook Messages, HD Images शेअर करत शिवप्रेमींना द्या शुभेच्छा
रायगडावर गागा भट्ट यांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला होता. राज्याभिषेक संपन्न झाल्यानंतर शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी मिळाली. आजही या सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा केला जातो.
महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 दिवशी रायगडावर झाला होता. त्यामुळे तारखेनुसार, शिवभक्त दरवर्षी 6 जूनला शिवराज्याभिषेकाचा सोहळा आनंदाने साजरा करतात. या दिवसानिमित्त त्यांना मानवंदना अर्पण केली जाते सोबतच त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा दिवस अभिमानाचा आणि आनंदाचा असल्याने त्याच्या शुभेच्छा सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Facebook Messages, Wishes द्वारा देत या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.
सण समारंभ यांच्या शुभेच्छा देण्यासाठी आजकाल WhatsApp अगदी सर्रास वापरले जाते. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छाही तुम्ही व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातून देऊ शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Shivrajyabhishek Sohala टाईप करा आणि डाऊनलोड करुन तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळींना पाठवा. (हेही वाचा,Shiv Rajyabhishek Din 2022 Wishes In Marathi: शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा Quotes, WhatsApp Status द्वारा देत शिवप्रेंमीचा दिवस करा खास! )
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा





रायगडावर गागा भट्ट यांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला होता. राज्याभिषेक संपन्न झाल्यानंतर शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी मिळाली. शिवाजी महाराजांना प्रशासनात मदत व सल्ला देणारी आठ मंत्र्यांची परिषद अष्टप्रधान मंडळ होते. या परिषदेचा प्रत्येक मंत्री त्याच्या विभागाचा प्रमुख होता. परिषदेचे सर्व सदस्य नेमण्याचा अधिकार शिवाजी महाराजांना होता. हे मंत्री शिवाजी महाराजांच्या उच्च सचिवांसारखे होते.
(The above story first appeared on LatestLY on Jun 06, 2025 07:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

