लोक पायात काळा धागा का बांधतात? यामागचे खरे कारण ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!
तर काही जण इतरांच्या सांगण्यावरून बांधतात. मात्र तुम्हाला माहित आहे का ज्योतिष शास्त्रानुसार, काळा धागा बांधताना काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
असं म्हणतात की, काळा धागा (Black Thread) बांधणे किंवा काळा टिका लावणे आपल्याला वाईट नजरांपासून (Black Magic) वाचवते. म्हणून पुरातन काळापासून पायात काळा धागा बांधणे ही गोष्ट अनेक जण करताना दिसतात. केवळ जन्मलेल्या बाळासाठी नाही तर अनेक मोठ्या माणसांच्या, तरुणांच्या पायातही तुम्हाला काळा धागा बांधलेला पाहायला मिळतो. कुणाची नजर लागू नये वा तुमच्यावर काही अनिष्ट ओढवू नये यासाठी हा काळा धागा बांधतात असे आपले आजी-आजोबा आपल्याला सांगायचे. त्यामुळे भारतीय संस्कृतीत पायात काळा धागा बांधणे ही जणू परंपराच बनली असं म्हणायला हरकत नाही. वाईट नजरेपासून वाचविण्याशिवाय इतर अनेक गोष्टींसाठी हा काळा धागा बांधला जातो.
सध्याच्या काळात अनेक लोक फॅशन म्हणून पायात काळा धागा बांधतात. तर काही जण इतरांच्या सांगण्यावरून बांधतात. मात्र तुम्हाला माहित आहे का ज्योतिष शास्त्रानुसार, काळा धागा बांधताना काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. Makar Sankranti 2019: मकर संक्रांत दिवशी काळे कपडे घालण्यामागील महत्त्व!
1. काळा धागा पायात बांधताना त्या धाग्याला 9 गाठी मारून मगच तो पायात बांधावा.
2. ज्या हातात वा पायात काळा धागा बांधला असले त्यावर त्याच रंगाचा कोणता अन्य धागा बांधू नये.
3. काळा धागा शुभ मुहूर्त बघून बांधावा. जर तुम्हाला शुभ वेळ माहित नसेल तर तुम्ही कोणत्याही ज्योतिषाला विचारून मगच त्यावेळेवर तो बांधावा.
4. काळा रंग शनि ग्रहाचा आहे. त्यामुळे काळा धागा बांधल्याने तुमच्या पत्रिकेतील शनि दोष च्या ग्रहांचा प्रभाव कमी होते.
5. हा धागा बांधल्यानंतर रोज गायत्री मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. असे केल्यास याचा प्रभाव वाढेल. तसेच ही गोष्ट ध्यानात ठेवा की जेव्हा तुम्ही गायत्री मंत्राचा जप कराल तो एका ठराविक वेळेतच करा.
6. तुम्ही तुमच्या घराच्या दरवाज्यावर लिंबूसह काळा धागाही बांधू शकता. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही.
7. ज्या लहान मुलांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना काळा धागा बांधल्यास आजारापासून लढण्याची ताकद देतो.
8. काळ्या रंगामध्ये उष्णतेला शोषण्याची शक्यता असते. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेपासून आपल्याला वाचविण्यास मदत करतो.
खरे पाहता काळा धागा तुम्ही पूर्ण श्रद्धेनिशी तुमच्या पायात बांधल्यास तो तुमची अनिष्ट गोष्टींपासून कायम रक्षा करतो. त्यामुळे जर तुम्ही वाईट नजरांपासून वाचू इच्छिता तर पायात काळा धागा बांधल्यास तो तुमची त्यापासून रक्षा करेल.