International Bat Appreciation Day 2020: जागतिक वटवाघूळ कौतुक दिन साजरा करण्यामागचे कारण काय? जाणून घ्या या पक्ष्याविषयी काही खास गोष्टी
त्यामुळे अशा पक्ष्याची लोकांना आठवण राहावी म्हणून आज म्हणजेच संपूर्ण जगभरात वटवाघूळांचा कौतकु दिन साजरा केला जातो.
आकाशात खूप दूरवर अशी उंच भरारी घेणारा पक्षी म्हणजे वटवाघूळ (Bat). महाराष्ट्रात अशुभ मानल्या जाणा-या या वटवाघळाला जगभरातील अनेक देशांमध्ये मात्र खूप शुभ मानले जाते. तर काही ठिकाणी वटवाघळांना भूत, मृत्यू आणि रोग यांचे प्रतिक मानले जाते. पर्यावरणास हानिकारक असल्याने त्याची संख्या आता हळूहळू कमी होत चालली आहे. त्यामुळे अशा पक्ष्याची लोकांना आठवण राहावी म्हणून आज म्हणजेच संपूर्ण जगभरात वटवाघूळांचा कौतकु दिन साजरा केला जातो. वटवाघूळ हे भूत, मृत्यू आणि रोग यांचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे त्यांची प्रतिमा लोकांमध्ये फारशी चांगली नाही.
वटवाघूळ रक्त शोषून घेणारा आणि वेगवेगळे रोग पसरवणारा पक्षी असल्यामुळे लोक त्याला फारसे पसंत करत नाही. मात्र या पक्ष्यामध्ये आपल्या नाकातून हळूवारपणे अतिशय उच्च वारंवारतेचे ध्वनी निर्माण करण्याची क्षमता आहे. हे स्वर उडत्या कीटकांवर आपटून मागे येतात. Coronavirus Research: भारतातील 4 राज्यांमधील वटवाघूळांमध्ये आढळला कोरोना व्हायरस; याआधी Bat द्वारेच झाले होते निपाहचे संक्रमण
जाणून घ्या वटवाघळाबाबत काही खास गोष्टी:
- वटवाघळातील ब-याच जाती हे फळे खाणे पसंत करतात.
- यातील ब-याच जाती या 40 वर्षांपर्यंत जगतात.
- रडारच्या तंत्रज्ञानात असते त्याप्रकारे वटवाघळे प्रतिध्वनी ऐकून आपल्या भक्ष्याचा वेध घेतात. अचूक अंदाज घेत ते त्या कीटकावर एकदम झडप घालतात.
- वटवाघळांची ही पद्धात काही कीटकांना माहिती आहे. अशा वेळी तेही विचित्र आवाज काढून वाघळांना चकवतात आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात.
- वटवाघूळ हा दूरपर्यंत उडण्याची क्षमता असलेला एकमेव सस्तन प्राणी आहे. वटवाघळे 120000HZ वारंवारते पर्यंत आवाज ऐकू शकतात.
- जगभरात जवळपास 1200 वटवाघळांच्या प्रजाती आहेत.
- यातील 48 जाती अमेरिकेत राहतात.
- चीनमध्ये वटवाघळांना दीर्घायुष्य आणि आनंदाचे प्रतीक समजतात.
- पोलंडमध्ये वटवाघळांना शुभ मानले जाते. एका पुराणकथेनुसार वटवाघळांना माणसाच्या केसांमध्ये घुसायला आवडते; पण त्यामागचे खरे कारण म्हणजे डास आणि इतर कीटक माणसाच्या डोक्याभोवती घोंघावत असताना, त्यांना खाण्यासाठी वटवाघळे येतात आणि ती चुकून माणसांच्या केसांमध्ये घुसतात.
- इंग्लंडमध्ये वटवाघळांची खूप काळजी घेतली जाते, आणि त्यांना किंवा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी कसली इजा होईल अशी कृती केली, तर त्या माणसाला मोठा दंड केला जातो.
अमेरिकेतल्या टेक्सास राज्यातल्या ऑस्टिनमध्ये तर सुमारे १५ लाख वटवाघळांचे एक अभयारण्यच आहे. सूर्यास्ताच्या सुमाराला ही वटवाघळे आपल्या घरट्यांमधून बाहेर पडतात. ते पाहण्यासाठी लाखभर पर्यटक तिथे गोळा होतात. वटवाघळांना उलटे लोंबायला आवडते. म्हणून ब-याचदा ते आपल्याला झाडावर उलेट लटकलेले दिसतात.