World’s Greatest Places of 2022 (संग्रहित संपादित प्रतिमा)

टाईम मॅगझिनने 2022 सालासाठी ‘जगातील सर्वोत्तम 50 ठिकाणां’ची (World’s Greatest Places of 2022) यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारतातील अहमदाबाद (Ahmedabad) आणि केरळ (kerala) या जागांचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणांची 'भेट देण्यासाठी 50 विलक्षण ठिकाणे' म्हणून निवड करण्यात आली आहे. 'टाइम'ने मंगळवारी सांगितले की, सध्या कोरानाच्या केसेस कमी होत आहेत, त्यामुळे हॉस्पिटॅलिटी उद्योग पुन्हा रुळावर येत आहे. टाईमने प्रसिद्ध केलेली ठिकाणे इतर पर्यटन स्थळांपेक्षा वेगळी आहेत आणि ती लोकांना काहीतरी नवीन, रोमांचक आणि मनोरंजक अनुभव देतात.

या यादीमधील सर्वाधिक 13 युरोपमधील, तर 10 उत्तर अमेरिका विभागातील आहेत. भारतामधील ठिकाणांबाबत टाईमने म्हटले आहे, ‘अहमदाबाद, भारतातील पहिले युनेस्को (UNESCO) जागतिक वारसा शहर, जिथे प्राचीन आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या नवकल्पना आहेत, ज्यामुळे ते सांस्कृतिक पर्यटनाचे केंद्र बनले आहे. या शहरातील साबरमती नदीच्या काठावर 36 एकरात वसलेला गांधी आश्रम म्हणजे शांत वातावरणासह एक आनंदी विहार आहे. या ठिकाणी 9 दिवस जगातील सर्वात मोठा नृत्य महोत्सव साजरा केला जातो.’

 

View this post on Instagram

 

A post shared by TIME (@time)

टाईमच्या यादीत असलेले देशातील अजून एक ठिकाण म्हणजे, नैऋत्य किनार्‍यावरील केरळ. मासिकाने म्हटले आहे, ‘हे देशातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे. केरळचे सुंदर समुद्रकिनारे, हिरवेगार 'बॅकवॉटर', मंदिरे आणि राजवाडे यांनी त्याच्या सौंदर्यात आणखीनच वाढ केली आहे.’ (हेही वाचा: Space Hotel: जगातील पहिले अंतराळ हॉटेल; एकावेळी 28 लोक राहू शकणार, 2025 मध्ये होणार सुरु)

या यादीमध्ये पुढील काही ठिकाणांचा समावेश आहे-

Africa-

Nairobi, Kenya

Hwange National Park, Zimbabwe

Franschhoek, South Africa

Asia- 

Ras Al Khaimah, UAE

Seoul, South Korea

Doha, Qatar

Kerala, India

Ahmedabad, India

Australia-

Great Barrier Reef, Australia

Fremantle, Australia

Europe-

Dolni Morava, Czech Republic

València, Spain

Portree, Scotland

North America-

Detroit, Michigan

Tofino, British Columbia

Riviera Nayarit, Mexico

South America-

Bogotá, Colombia

São Paulo, Brazil

Salta, Argentina

तुम्ही या ठिकाणी ही पूर्ण यादी पाहू शकता.

दरम्यान, ही यादी प्रसिद्ध करत टाईमने म्हटले आहे की, ‘2022 मध्ये जीवनातील आव्हाने जितकी अवघड असतील, तितकीच आशा आहे की प्रवासाद्वारे मानावांमधील नाते अधिक दृढ होईल. जगभरातील बहुतांश लोकसंख्येचे कोविड-19 विरुद्ध लसीकरण करण्यात आले आहे, त्यामुळे लोक पुन्हा प्रवासासाठी बाहेर पडत आहेत. हॉस्पिटॅलिटी उद्योग पुन्हा बहरत असून, प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी तो सज्ज आहे.’