मुंबई गोवा प्रवास आता आलिशान क्रुझमधून...

तर मग तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

Representational Image (Photo credits: grossk/Pixabay)

गोवा म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो. गोव्याला तुम्ही रेल्वेने, बसने किंवा विमानाने गेले असाल. पण समुद्रांच्या लाटांवर विहार होत कधी गोव्याच्या किनाऱ्यावर पोहचण्याचा आनंद घेतला आहे का? घेतला नसेल तर तशी इच्छा मात्र नक्कीच असेल. तर मग तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे.

भारतातील पहिली क्रुझ मुंबई ते गोवा असा प्रवास करणार आहे. 131 मीटर लांब, 17 मीटर रुंदीची ही क्रुझ आहे. 24 ऑक्टोबरला मुंबई ते गोवा ही ऐतिहासिक सफर होणार आहे. हा प्रवास सुमारे 16 तासांचा असेल.

भारतातील ही पहिली क्रुझ असून तिचे नाव आंग्रिया आहे. अंग्रिया मराठा नौसेनाचे पहिले अॅडमिरल कान्होजी अंग्रे होते. कान्होजी भारतीय समुद्राचे बादशाह होते. त्यावरुन या क्रुझचे नाव ठेवण्यात आले आहे.

या क्रुझवर 2 अल्पोपाहार गृहं, बार, तरण तलाव,  गोल्फ क्लब या सुविधा देण्यात आल्या आहेत.

या क्रुझच्या तिकीटाची किंमत 4300 रुपयांपासून ते 12000 रुपये आहे. जेवणाची किंमत तिकीटात समाविष्ट केलेली आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ही क्रुझ पर्यावरण पूरकही आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला येथे प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर एकाच वेळी हजार लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी खास उपकरणं बसवण्यात आली आहेत. मुंबई गोवा प्रवासादरम्यान परिसराची माहिती व्हावी, यासाठी क्रुझवर मार्गदर्शकही असेल.

या क्रुझमधून तुम्ही हिवाळा आणि उन्हाळ्यात प्रवास करु शकता. पण पावसाळ्यात ही सुविधा बंद ठेवण्यात येईल.