Matheran E-Rikshaw Update: माथेरानमध्ये लवकरच पर्यावरणपूरक ई-रिक्षा, चाचणी पूर्ण

सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निर्देशानुसार या रिक्षांची चाचणी (E-Rickshaw Trial in Matheran) अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडली. या वेळी स्थानिक नागरिकही उपस्थित होते.

Matheran E-Rickshaw | (Photo Credit - Twitter)

माथेरानमध्ये लवकरच पर्यावरणपूरक ई-रिक्षा (Eco-friendly E-Rickshaw in Matheran) दिसणार आहेत. सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या निर्देशानुसार या रिक्षांची चाचणी (E-Rickshaw Trial in Matheran) अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडली. या वेळी स्थानिक नागरिकही उपस्थित होते. ही चाचणी यशस्वी ठरल्याने आता माथेरानमध्ये लवकरच ई-रिक्षा पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या सेवेत हजर होणार आहेत. ई-रिक्षाचे प्रात्यक्षिक घेत असताना कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदुषण, शांतता भंग अथवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली.

सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात महाराष्ट्राला माथेरान इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्याची परवानगी दिली होती. जेणेकरून त्या परिसरात चालणाऱ्या हाताने ओढलेल्या रिक्षांच्या जागी त्यांची व्यवहार्यता तपासावी. माथेरानमध्ये ब्रिटीश काळापासून हिल स्टेशन कारला परवानगी दिली जात ​​​​नाही. लोकांना एकतर चालत जावे लागते किंवा वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या 460 घोड्यांपैकी एक किंवा हाताने ओढलेल्या 94 रिक्षांचा वापर करावा लागतो. (हेही वाचा, E-rickshaws in Matheran: ई-रिक्षा चाचणीसाठी माथेरान पालिकेला राज्य सरकारचे आदेश)

ट्विट

ई-रिक्षाचे प्रात्यक्षीक सुरु होते तेव्हा सुरेखा भगणे (नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी), अजय कराळे (सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी), चंद्रकांत माने, आरटीओ पनवेल, संजय पाटील, डीवायएसपी कर्जत पीसीबी सागर किल्लेदार, आर. एस. कामत, प्रभारी पोलीस निरीक्षक शेखर लव्हे आणि ई रिक्षाचे याचिकाकर्ते सुनील शिंदे यांच्यासह माथेरान शहर आणि परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून ई-रिक्षाचे स्वागतही केले.