Byculla Zoo: भायखळा येथील राणीची बाग येत्या 22 ऑक्टोंबर नंतर सुरु होण्याची शक्यता
भायखळा येखील राणीची बाग येत्या 22 ऑक्टोंबर नंतर नागरिकांसाठी खुली करण्याचा विचार अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात ट्विट करत असे म्हटले होते की, येत्या 22 ऑक्टोंबर पासून नाट्यगृहे आणि सिनेमागृह सुरु करण्यास परवानगी असणार आहे.
Byculla Zoo Re-Open: भायखळा येखील राणीची बाग येत्या 22 ऑक्टोंबर नंतर नागरिकांसाठी खुली करण्याचा विचार अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या महिन्यात ट्विट करत असे म्हटले होते की, येत्या 22 ऑक्टोंबर पासून नाट्यगृहे आणि सिनेमागृह सुरु करण्यास परवानगी असणार आहे. अशातच आता वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान आणि झू सुरु करण्याकडे लक्ष दिले जात आहे.(Tejas Thackeray यांचे नवे संशोधन, मुंबईत आढळली 'ईल' माशाची नवी रक्तवर्णीय प्रजाती, नाव ठेवले 'Rakthamichtys Mumba')
राणीची बाग सुरु झाल्यानंतर तेथे काही आकर्षणात्मक गोष्टी नागरिकांना पहायला मिळणार आहे. त्यामध्ये मुख्य म्हणजे दोन नवे हॅम्बोल्ट पेंग्विन तेथे असणार आहेत. त्याचसोबत सिद्धार्थ गार्डन आणि औरंगाबाद येथून 2020 मध्ये शक्ती आणि करिश्मा या रॉयल बंगालच्या वाघिणींना ही तेथे आणण्यात आले आहे. राणीची बाग कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर 15 फेब्रुवारी 2021 रोजी सुरु करण्यात आली होती. मात्र दुसऱ्या लाटेमुळे ती पुन्हा एकदा बंद केली गेली.(Hermit Crab: हार्मीट खेकडा, समुद्रातील प्लास्टिक प्रदुषणाकडे होतोय लैंगिकदृष्ट्या आकर्शित)
Tweet:
राणीबागेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, नागरिकांसाठी हे झू सुरु करण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळे नागरिकांकडून आम्हाला वारंवार राणीची बाग कधी सुरु केली जाईल असे प्रश्न विचारले जात आहेत. अशातच 22 ऑक्टोंबर नंतर राणीची बाग सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्याचसोबत झू एकदा सुरु केल्यानंतर तेथे कोरोनाच्या नियमांचे पालन करुनच प्रवेश दिला जाणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)