Sex Tips: सेक्स लाईफ मध्ये महिला 'या' 5 कारणांमुळे नसतात समाधानी; जाणून घ्या
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

Sex Tips: अनेक विवाहित स्त्रिया आपल्या पतीसोबतच्या सेक्स लाईफमुळे समाधानी नसतात. परिणामी अशा महिला परक्या व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवतात. ही बाब समाजाच्या दृष्टीकोनातून योग्य नसली तरी यामागे विविध कारणं असतात. आज या लेखातून महिला सेक्स लाईफमध्ये का समाधानी नसतात, यासंदर्भातील कारणं जाणून घेऊयात.

पुरुष आणि स्त्रियांच्या रिलेशनशिप मध्ये सेक्स ही महत्त्वाची गोष्ट असते. परंतु, अनेक कारणांमुळे महिला सेक्शुअल लाईफमध्ये समाधानी नसतात. यासंदर्भात बोलण्यास महिला तयार नसतात. खालील कारणांमुळे महिला आपल्या सेक्शुअल लाईफमध्ये समाधानी नसतात. (वाचा - Sex During Lockdown: लॉकडाउन मुळे सेक्स लाईफ झालंय बोअरिंग रुटीन? पुन्हा स्पार्क आणण्यासाठी 'या' खास टिप्स करतील मदत)

सेक्स संदर्भात रुची कमी होणं -

पुरुषांचे त्यांच्या पत्नीप्रती प्रेम, स्नेह आणि सन्मान कमी झाल्यास त्या महिलेचा सेक्स संदर्भातील रुची कमी होते. अशा परिस्थितीत महिला फिजिकल इंटिमेसी संदर्भात विचार करत नाहीत. लैंगिक संबंध ठेवले तरी अशा महिला सेक्स इंजॉय करत नाहीत.

कामाचा ताण -

महिलांवर संपूर्ण घराची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांचा संपूर्ण वेळ कामात जातो. त्यामुळे स्त्रिया शारिरिक तसेच मानसिकरित्या थकून जातात. परिणामी महिला सेक्स दरम्यान असमाधानी असतात.

बोरिंग किंवा इमोशनलेस सेक्स -

बोरिंग किंवा इमोशनलेस सेक्समुळे महिला असमाधानी असतात. महिलांना सेक्स करताना पुरुषांच्या आपल्या प्रती काय भावना आहेत, हे जाणून घेण्यात अधिक रुची असते. त्यामुळे इमोशनलेस सेक्समुळे त्या समाधानी होत नाहीत.

सेक्सी असल्याची जाणीव न होणं -

सेक्सी असल्याची जाणीव न झाल्याने अनेक महिला सेक्स दरम्यान समाधानी नसतात. वाढलेले वजन आणि इतर कारणांमुळे पुरुष स्त्रियांच्या भागांकडे आकर्षित होत नाही. त्यामुळे महिलांना सेक्स दरम्यान कंफर्टेबल नसतात. परिणामी त्यांना सेक्सचा आनंद घेता येत नाही.

सेक्शुअल फ्रस्टेशन -

लैंगिक संबंध ठेवताना आपल्याला नेमकी कोणती गोष्ट आवडते, हे आपल्या पाटर्नरला सांगणं अनेक महिलांना कठीण जातं. त्यामुळे त्यांना सेक्स लाईफचा आनंद घेता येत नाही. परिणामी त्यांना सेक्शुअल फ्रस्टेशनला सामोरं जावं लागतं.