Sex Fetishes: सेक्स म्हणजे एक खाजगी बाब असते आपण सगळेच मानतो मात्र तरीही अनेकांंना सार्वजनिक ठिकाणी सेक्स बाबत विशेष कुतुहुल असते, आपण कोणतीही पॉर्न साईट पाहिली असेल तर हे Sex In Public Places अशी कॅटेगरी नेहमी टॉप 5 मध्ये असते. आपल्यापैकी सुद्धा कधी ना कधी असे काही करावे असे वाटुन गेले असेल, काहींंना तर ही इच्छा अधिक तीव्रतेने जाणवत असेल पण असं नेमकं का होतं असावंं हे माहित आहे का? याचं मुख्य कारण म्हणजे थ्रिल, अर्थात आपल्याला कोणीतरी पाहतंय किंंवा सेक्स करताना आपला आवाज ऐकतंय हे अनेकांंना थ्रिलिंग वाटु शकते म्हणुनच सार्वजनिक ठिकाणी सेक्स बाबत अनेकांंना क्रेझ असु शकते. पण हा मुद्दा फक्त थ्रिल चा नसुन ही एक प्रकारची सेक्श्युअल फेटिश सुद्धा आहे, फेटिश म्हणजे सोप्प्या शब्दात सांंगायचं तर एखाद्या पद्धतीने सेक्स करण्याची तीव्र इच्छा किंंवा Fantasy. अशाच प्रकारे जेव्हा एखाद्याला सार्वजनिक ठिकाणी सेक्स करण्याची फेटिश जाणवते त्याला Agoraphilia असे म्हणतात, काय आहे हा प्रकार चला तर जाणुन घेऊयात...
आपण फार पुढे जाण्याआधी हे समजुन घ्या की सार्वजनिक ठिकाणी सेक्स करणे हे बेकायदेशीर आहे, निदान भारतात तरी असे प्रयोग करायला जाऊ नका. तर अॅग्रोफिलिया मध्ये केवळ सार्वजनिक ठिकाणी सेक्स करण्याची इच्छा नसुन यामध्ये आपल्याला कोणीतरी पाहतंय, किंंवा आपण पकडले जातोय ही भीती असताना सेक्स करणे हे थ्रिल अनुभवणे हा मुख्य मुद्दा असतो. या थ्रिल मुळे या मंंडळींना उत्तेजना मिळते त्यांंच्या शरीरात हार्मोन्सचा प्रवाह सुरु होतो असे म्हणतात.
Open Sex: जगातील 'या' पाच शहरांमध्ये सेक्स केला जातो खुलेआम, तुम्हाला यातील किती नावं माहित आहेत?
दुसरं म्हणजे काहींंना केवळ प्रयोग म्हणुन असं काही करुन पाहण्याची इच्छा असते, अनेकांंच्या सेक्स बकेट लिस्ट मध्ये याचा जरुर समावेश असतो. अशा पद्धतीच्या इच्छा आपल्यालाही जाणवत असतील तर त्यावर आपण रिलेशनशीप अॅडवायजरचा सल्ला घेऊ शकता. हा कोणताही आजार नाही त्यामुळे लाजु नका.