Sex With Lights On: जाणून घ्या प्रकाशात सेक्स करण्याचे आश्चर्यकारक फायदे; मिळवू शकाल द्विगुणीत परमोच्च सुख
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सेक्स (Sex) करण्यासाठी काळ-वेळ यांचे बंधन असणे गरजेचे नाही. पार्टनरची सहमती असल्यास तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कशा प्रकारचा सेक्स करावा, कुठे सेक्स करावा यावरही बंधन नसते. सेक्स करताना कपडे कोणते घालावे, कंडोम कुठला वापरावा या गोष्टीही कधी कधी गौण ठरतात. मात्र एक गोष्ट अशी आहे जी सेक्स करताना महत्वाची ठरते व त्यामुळे सेक्सची मजा वाढते ती म्हणजे... प्रकाश (Lights) किंवा हलका प्रकाश. अनेक लोकांना अंधारात सेक्स करायला आवडतो मात्र सेक्सवेळी थोडा तरी प्रकाश असणे हे नेहमीच फायद्याचे ठरते. तर आज आम्ही तुम्हाला लाईट्स सुरु असताना सेक्स करण्याचे काय फायदे याबाबत माहिती देत आहोत.

तुम्ही काय करताय हे लक्षात येते –

बरेचवेळा सेक्समध्ये अंधारात दोन्ही पार्टनर नक्की काय करत आहेत हे लक्षात येत नाही व यामुळे दोघांमधील समन्वय बिघडण्याची शक्यता असते, अशावेळी खोलीत थोडा तरी प्रकाश असणे गरजेचे आहे.

सुरक्षितता –

सेक्स करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता महत्वाची, यासाठी खोलीत प्रकाश असणे गरजेचे आहे. कंडोम फाटणे, त्यामध्ये बबल राहणे, कुठे वीर्याचे डाग पडणे, इतकेच नाही तर पार्टनरला कोणत्या प्रकारचा त्वचेचा आजार किंवा STD सारखे रोग तर नाही ना, अशा अनेक गोष्टी प्रकाशातच समजू शकतात.

अचूक स्पर्श –

लैंगिक संबंध ठेवताना तन-मन-धन एकत्र येतातच, मात्र आपण जे काही डोळ्यांनी पाहतो त्यामुळेही आपणाला परमोच्च सुख मिळण्यास मदत होते. पुरुष आणि स्त्री दोघेही पार्टनरची नग्न शरीरे पाहूनच सर्वप्रथम उत्तेजित होतात. संभोगाच्या वेळी आपण हातांनी एकमेकांच्या अंगाला स्पर्श करतो, ज्यामुळे आपल्या मेंदूत अनेक प्रकारच्या भावनांचा जन्म होतो. हा स्पर्श अचूक असणे गरजेचे आहे व त्यासाठी सेक्स करताना थोडा तरी प्रकाश असणे गरजेचे आहे.

सेक्स पोझिशन-

अनेकदा सेक्समध्ये वाहवत जाताना आपणाला काही सेक्स पोझिशन्स ट्राय करण्याचा मोह होतो, अशावेळी लाईट्सची गरज भासते. दोघांनाही परमोच्च सुख मिळण्यासाठी तुम्ही आचरणात आणत असलेली पोझिशन योग्य असणे महत्वाचे आहे, ज्यासाठी तुम्हाला प्रकाशाची गरज भासते.

चेहऱ्यावरील भाव भावना –

अनेकदा प्रकाशात सेक्स केल्यास तुम्ही तुमच्या पार्टनरच्या चेहऱ्यावरील भाव–भावना समजून घेऊन सेक्सचा आवेग कमी जास्त करू शकता. तसेच तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडून नक्की काय अपेक्षित हे समजायलाही यामुळे मदत होते. (हेही वाचा:  लॉकडाउन मध्ये Self Love ला पसंती, सेक्स पार्टनर दूर असलेल्यांना Masturbation चा आधार, वाचा हा खास Survey)

अंधारात लैंगिक संबंध ठेवल्यास आपण कदाचित त्या सेक्सचा पूर्णतः आनंद घेऊ शकणार नाही. भारतातील बहुतेक स्त्रियांना अंधारात सेक्स करायला आवडतो, मात्र यामागे ‘लाज’, ‘शरम’ ही कारणे आहेत. मात्र सेक्समधून या गोष्टी काढून टाकल्यास दोन्ही पार्टनर सेक्सचा उत्तम अनुभव घेऊ शकतील.