Sex Tips: जोडीदारासोबत खूप दिवसानंतर सेक्स करत असाल तर अतिघाई न करता 'या' गोष्टींनी करा प्रणयक्रिडेला सुरुवात
खूप दिवसांनंतर जर तुम्ही आपल्या जोडीदारासोबत सेक्स करत असाल तर काही ठराविक गोष्टी ध्यानात ठेवा
सध्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अनेक जोडपी सेक्स (sex) करणे टाळत असतील. मात्र आता या गोष्टीला 5 महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे जोडप्यांनाही हा दुरावा सहन होत नसेल. अशा वेळी जर तुम्ही सेक्स करण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. अधाशी असल्यासारखे न वागता संयमाने घ्या. आपल्या जोडीदाराला (Couple) समजून घ्या. त्याची मानसिक स्थिती (Mental Condition) समजून घेऊन संभोगाला सुरुवात करा.
खूप दिवसांनंतर जर तुम्ही आपल्या जोडीदारासोबत सेक्स करत असाल तर काही ठराविक गोष्टी ध्यानात ठेवा
1. एकमेकांशी मनमोकळेपणाने बोला
सेक्सला सुरुवात करताना आर्ततायीपणा न करता एकमेकांशी आधी मनमोकळेपणाने बोला. कारण जर तुमच्यातील संवाद संपला तर नातं तुटायला जास्त वेळ लागत नाही असं म्हणतात. घरात एकत्र राहतो याचा अर्थ प्रेम आहे असे होत नाही. ते प्रेम निभावण्यासाठी आता जोडीदाराच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे संवाद साधा. Sex Tips: वजनदार महिलांसोबत संभोग करताना 'या' हॉट पोजिशन्स देतील सेक्सचा थ्रिलिंग अनुभव
2. एकमेकांना वेळ द्या
एकमेकांशी छान बोलून सेक्ससाठी आपल्या जोडीदाराची मानसिक तयारी होईपर्यंत थोडं थांबा. एकमेकांना वेळ द्या.
3. फोरप्ले करा सुरुवात
त्यानंतर आपल्या जोडीदाराला प्रेमाने जवळ करुन मिठी मारून, तिचे चुंबन घेऊन फोरप्ले छान एन्जॉय करा.
या सर्व गोष्टी ध्यानात ठेवून अशाच पद्धतीने सेक्सला सुरुवात करा. खूप दिवसांच्या अंतरामुळे या गोष्टी केल्यास तुम्हाला सेक्स दरम्यान परमोच्च सुखाचा आनंद मिळेल.