Sex Tips: French Kiss करताना 'या' गोष्टी ध्यानात ठेवल्यास शरीरास होतील फायदे

ज्या किसच्या माध्यमातून तुमच्या सेक्सविषयीच्या भावना जोडीदारापर्यंत पोहोचतात.

French Kiss (Photo Credits: Wikimedia Commons)

सेक्स साठी आपल्या जोडीदाराचा मूड बनविण्यासाठी फोरप्ले करणे जितके जरुरीचे आहे तितकेच जोडीदाराला ओठांवर किस करणे सेक्ससाठी गरजेचे असते. सेक्स करण्याआधी आपण जोडीदाराला किस करतो जेणे करुन त्याचाही मूड बनून तो सेक्ससाठी उत्तेजित होतो. या किसचे देखील अनेक प्रकार आहेत. त्यात सर्वात प्रचलित असलेला प्रकार म्हणजे 'फ्रेंच किस' (French Kiss). हा प्रकार जरा अनेकांना थोडा विचित्र वाटत असला तरीही तो करण्यात आपण आपल्या जोडीदाराला एक वेगळाच अनुभव देऊ शकतो. ज्या किसच्या माध्यमातून तुमच्या सेक्सविषयीच्या भावना जोडीदारापर्यंत पोहोचतात.

परंतू अनेकांना फ्रेंच किस कसा करावा हे माहितच नसते. त्यामुळे सर्वात आधी कसे करावे हे जाणून घ्या

1. फ्रेंच किस करताना डोळे नेहमी बंद असावे जेणेकरुन त्यामागची भावना तुमच्या जोडीदारापर्यंत पोहोचेल.

2. तुमच्या ओठांना फ्रेंच किस साठी तयार करा आणि जोडीदाराशी ताळमेळ ठेवून हे किस करावे अन्यथा तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकणार नाही.

हेदेखील वाचा- Types Of Kisses: जोडीदारासोबतचे नाते आणखी घट्ट करण्यास मदत करतील हे 7 प्रकारातील चुंबन

3. किस करत असताना जेव्हा तुम्ही तो अनुभवाल तेव्हा तुम्ही तुमची जिभ तुमच्या जोडीदाराच्या तोंडात टाकण्याचा प्रयत्न करा.

4. नाकाने श्वासोच्छवास सुरु ठेवा आणि हे किस थोडा जास्त वेळ सुरु ठेवा तरच तुम्ही आणि तुमचा जोडीदार त्याचा आनंद घेऊ शकाल.

5. हे किस करताना तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा त्याच्या चेह-याला घट्ट पकडलात तर त्यातून मिळणारा आनंद खूपच अद्भूत असेल.

फ्रेंच किस चे फायदे:

1. फ्रेंच किस केल्याने तुमचे मानसिक तणाव कमी होऊन थकवा दूर होतो.

2. फ्रेंच किस केल्याने तुमचा मूड चांगला राहतो आणि तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.

3. या किस मुळे तुमच्या शरीरातील हार्मोन ऑक्सिटोसिन वाढतात.

4. तुमचे तुमच्या जोडीदाराशी घट्ट नाते बनविण्यासाठीही फ्रेंच किस खूप फायदेशरी ठरते.

त्यामुळे फ्रेंच किस पाहायला जरी विचित्र वाटत असले तरी तो करताना त्याचा आनंद घेतल्यास त्याची मजा द्विगुणित होईल.