Sex Tips: झोपताना 'ही' गोष्टी केल्यास सेक्स पॉवर कमी होण्याची सर्वात जास्त शक्यता- सर्वे
Sex (Photo Credits: Pixabay)

थंडीच्या (Winter) सीझनला सुरुवात होताच अनेकांच्या सेक्स ड्राइव्स (Sex Drive) वाढू लागतात, पण कितीही इच्छा असली तरीही स्टॅमिना (Stamina)  काही केल्या वाढत नाही. असा त्रास अलीकडे अनेक कपल्स मध्ये पाहायला मिळतो, अनेकदा तर हे विषय पतिपत्नीच्या वादाचे कारण देखील बनतात.सेक्स पॉवर किंवा स्टॅमिना कमी असणं ही काही मुळात नैसर्गीक समस्या नाही,तर प्रत्येकाच्या जीवनशैलीतून उमटणारे परिणाम आहेत, अलीकडेच याबाबत झालेल्या एका सर्वेक्षणातून अशा काही गोष्टी समोर आणल्या गेल्या आहेत ज्या केल्याने व्यक्तीची सेक्स पॉवर कमी होण्याची सर्वात जास्त भीती असते. यामध्ये तुमच्या हातात असणाऱ्या मोबाईलच्या जास्त वापरापासून ते तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळांपर्यंत अनेक बाबींचा समावेश आहे. (Sex Benefits: जाणून घ्या दररोज सेक्स करण्याचे काही आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे)

मोरोक्को च्या कासाब्लांका येथील, शेख खलीफा बेन जायद आंतराष्ट्रीय विश्वविद्यालय व रुग्णालयाच्या लैंगिक आरोग्य विभागातून हा सर्व्हे करण्यात आला होता, यानुसार सेक्स पॉवर कमी होण्याच्या घटनांमध्ये 60 % त्रास हा स्मार्टफोन्सच्या अतिरिक्त वापरामुळे उद्द्भवत असल्याचे दिसून आले आहे. या सर्व्हेसाठी तब्बल 600 जणांचे अनुभव आणि जीवनशैली रेकॉर्ड करण्यात आली होती. यापैकी 92 % प्रतिनिधींनी आपण रात्री झोपण्याच्या वेळी फोन वापरत असल्याचे सांगितले तर उर्वरित मंडळींनी आपण झोपण्याआधी फोन फ्लाईट किंवा सायलेंट मोड वर टाकत असल्याचे सांगितले. अभ्यासानुसार झोपण्याआधी जे व्यक्ती फोनचा वापर करणारे आहेत त्यांच्या सेक्स पॉवरची कमतरता दिसून आली तर इतरांमध्ये हे परिमाण उलटे सिद्ध झाले. दरम्यान, यामध्ये वय, खाण्याच्या पद्धती या सवयींचा देखील परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

तसेच याआधी अमेरिकन कंपनी श्योरकॉल तर्फे करण्यात आलेल्या अभ्यासात फोन झोपण्याआधी केवळ वापरल्यानेच नव्हे तर बेडच्या देखील परिणाम जाणवत असल्याचे समोर आले होते. म्ह्णूनच तुम्हालाही झोपण्याआधी फोन वापरण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा.