Sex Tips: तुमच्या सेक्स लाइफ ला बूस्ट करण्यासाठी 'या' खाद्य पदार्थांचे सेवन करा
लैंगिक आरोग्यासाठी कोणतेही औषध घेण्यापूर्वी, एक विशेषज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा आयुर्वेदाने शिफारस केलेले खाद्यपदार्थ खा कारण त्यांचे सेवन केल्याने तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.
बाजारात अशी अनेक उत्पादने आहेत जी लैंगिक आरोग्य बूस्ट करण्याचा दावा करतात.परंतु या औषधांचा लैंगिक जीवन आणि आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. आपल्याला ते घेण्याची सवय देखील होऊ शकते. म्हणूनच, लैंगिक आरोग्यासाठी कोणतेही औषध घेण्यापूर्वी, एक विशेषज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा आयुर्वेदाने शिफारस केलेले खाद्यपदार्थ खा कारण त्यांचे सेवन केल्याने तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. खाद्य पदार्थ आणि औषधी वनस्पतींचा एक समूह आहे जो आपल्याला लैंगिक समस्यांपासून मुक्त करण्यास मदत करू शकतो. त्याच्या सेवनाने (इरेक्टाईल डिसफंक्शन, वंध्यत्व (infertility), ताठरपणा(frigidity) यांसारख्या समस्या ही दूर होऊ शकतात. (Natural Viagra: स्वयंपाकघरात असलेल्या 'या' नैसर्गिक पदार्थांचे सेवन करा; वियाग्रा सारखे करतात काम )
तूप: आयुर्वेदानुसार तूप शरीरात उतींना जोडणारी जैविक ऊर्जा ओजस सारखे कार्य करते, जे लैंगिक कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
मध: मधात बोरॉन नावाचे खनिज असते. हे टेस्टोस्टेरॉन आणि एस्ट्रोजन पातळी वाढविण्यासाठी ओळखले जाते. हे हार्मोन सेक्शुअल फंक्शनला चालना देण्याचे कार्य करते.
दूध: दुध निरनिराळ्या पोषक द्रव्यांनी भरलेले असते, जे अंथरुणावर चांगले कार्य करण्यासाठी ऊर्जा प्रदान करते. जेव्हा आपण त्यात काही मसाले घातले तेव्हा त्याची क्षमता अधिक वाढते. जसे केशर, बदाम इ. (Having Sex Regularly Make You Fat?: नियमित सेक्स केल्याने महिलांचे वजन वाढते का? )
तांदूळ खीर: तांदूळाच्या खीरमध्ये ड्रायफ्रूट्स , केशर, दूध, वेलची इत्यादी असतात. या सुपर-फूड्सना बूस्टिंग फूड म्हणतात आणि ते आपल्या लैंगिक आरोग्यासाठी चांगले आहेत. त्यांना खाल्ल्यानंतर रात्रीची अंथरुणातली आपली कामगिरी वाढते, कारण खीर त्वरित ऊर्जा देखील देतो.
( टीप- या लेखात आरोग्याशी संबंधित सर्व माहिती माहितीच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी याचा वापर केला जाऊ नये आणि आम्ही असा दावा करू शकत नाही की लेखात नमूद केलेल्या टिप्स पूर्णपणे प्रभावी असतील, म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचनांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)