Sex Survey: सेक्स साठी सोशल डिस्टंसिंग, लॉक डाऊन चे नियम तोडल्याची अनेकांनी दिली कबुली; पहा काय सांगतोय हा नवा सर्व्हे
जे कपल्स एकत्र अडकले आहेत त्यांना एकमेकांच्या जवळ येण्याची ही एक संधी मिळाली आहे तर दूर असणाऱ्या कपल्ससाठी मात्र हा काळ बराच कठीण सिद्ध होत आहे. हा दुरावा सहन न झाल्याने अनेकांनी तर सोशल डिस्टंसिंग तसेच लॉक डाऊन चे सर्व नियम धाब्यावर बसवले आहे
लॉकडाउन (Lockdown) मध्ये अनेकांच्या सेक्स लाइफ (Sex Life) मध्ये बदल घडले आहेत. जे कपल्स एकत्र अडकले आहेत त्यांना एकमेकांच्या जवळ येण्याची ही एक संधी मिळाली आहे तर दूर असणाऱ्या कपल्ससाठी मात्र हा काळ बराच कठीण सिद्ध होत आहे. हा दुरावा सहन न झाल्याने अनेकांनी तर सोशल डिस्टंसिंग तसेच लॉक डाऊन चे सर्व नियम धाब्यावर बसवले आहे. याची कबुली सुद्धा त्यांनी दिली आहे. पार्टनरला भेटण्यासाठी लॉक डाऊन मोडत अनेक जण घराबाहेर पडल्याचे अलीकडेच झालेल्या एका सर्व्हे मधून दिसून आले आहे. IllicitEncounters.com या वेबसाईटने याबाबत निरीक्षण केले आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले की 2000 लोकांच्या गटात दर पाच पैकी एकाने सेक्स साठी लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचे कबूल केले आहे. याबाबत सविस्तर माहिती या लेखातून जाणून घ्या..Coronavirus Outbreak: कोरोना मुळे Condom आणि Contraceptives च्या विक्रीत चकित करणारी वाढ; वाचा विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया
llicitEncounters.com ही एक ऑनलाईन डेटिंग वेबसाइट आहे. अलीकडेच त्यांनी 2000 लोकांसोबत हे सर्वेक्षण केले होते. यामध्ये सुमारे 48% लोक अशी जोडपी आहेत ज्यांना लॉकडाउनपूर्वी संबंध होते पण आता ते एकत्र राहत नाहीत. 22 टक्के लोक असे होते जे लॉकडाउनपूर्वी त्यांच्या भागीदारांवर फसवणूक करीत होते. सुमारे 8 टक्के असे लोक आहेत ज्यांनी या काळात नवीन अफेअर्स सुरू केले आणि सेक्स साठी नवीन पार्टनर शोधला आहे. या पैकी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या ही निम्म्याहून अधिक (61%) इतकी आहे. या लोकांनी आपल्या घरून निघून पार्टनरच्या घरी जाण्याचा मार्ग निवडत आपली सेक्सची इच्छा पूर्ण केली आहे.
याबाबत IllicitEncounters.com मधील रिलेशनशिप तज्ञ जेसिका लिओनी यांनी सांगितले की, “हे काही आश्चर्य नाही की सर्वेक्षणातून पाच जणांपैकी एकाने सेक्स साठी लॉक डाऊन तोडले आहे. विशेषत: रात्री उशिरा सेक्सची इच्छा होणे हे प्रमाण अधिक असते. अनेकजण फेसटाइम किंवा झूम वर सुरुवातीला बोलतात यावेळी त्यांच्या इच्छा वाढतात आणि मग न राहावून ही लोकं पार्टनरला भेटण्यासाठी घराबाहेर पडतात. रात्री उशिरापर्यंत कॉल सुरु असल्याचे प्रमाणही या काळात वाढले आहे.
दरम्यान, हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे की लॉकडाउन हे आपल्याला कोरोना व्हायरसचा पराभव करण्यास मदत करेलअशावेळी नियम मोडून स्वतःचे जीवन आणि आपल्या प्रियजनांचे जीवन धोक्यात घालणे योग्य ठरणार नाही. तसेच, हे लक्षात घेणे देखील महत्वाचे आहे की कोरोना व्हायरस संभोगाच्या माध्यमातून संक्रमित होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रूग्णांच्या वीर्यामध्ये वैज्ञानिकांना विषाणूचे प्रमाण सापडले होते यावरून प्राणघातक विषाणूचा प्रसार सेक्सद्वारे होणे सुद्धा शक्य आहे त्यामुळे काळजी घेणं हे आपल्या हातात आहे.