Sex Life: नात्यातील समाधानासाठी किती वेळा सेक्स करायला हवा? कसे आनंदी ठेवाल तुमचे लैंगिक जीवन, घ्या जाणून
केवळ मनोरंजनासाठी होणारा, आपल्या जोडीदारासह नाते मजबूत करणारा आणि कौटुंबिक नियोजन करण्यासाठी केला जाणारा. तिन्ही प्रकारच्या सेक्सची स्वतःची महत्त्वपूर्ण भूमिका असते
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीचा ताण लोकांच्या केवळ शरीरावरच नाही, तर मनावरही आहे. यामुळे अनेक कौटुंबिक नात्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इतकेच नाही तर लोकांच्या सेक्स लाइफवरही (Sex Life) त्याचा फार मोठा परिणाम झाला आहे. तज्ञांच्या मते, या साथीमुळे लोकांमध्ये वाढलेल्या तणावामुळे त्यांची लैंगिक इच्छा कमी होत आहे. अशा परिस्थितीत, अनेक जोडप्यांमध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झाला की ते पुन्हा एक चांगले लैंगिक जीवन सुरू करू शकतात का? तज्ञांचा असा विश्वास आहे की, एक चांगले आणि समाधानी लैंगिक जीवन सुरू करण्यासाठी जोडप्यांना आठवड्यातून एकदा सेक्स केला पाहिजे.
अमेरिकन असोसिएशन ऑफ मॅरेज अँड फॅमिली थेरपिस्टचे क्लिनिकल फेलो आणि सेक्स थेरपिस्ट इयान कर्नर यांच्या म्हणण्यानुसार, आठवड्यातून एकदा सेक्स करणारे लोक सर्वात आनंदी असतात आणि ते आपल्या नात्यामध्येही समाधानी असतात. गरोदरपणाबाबतच्या एका पॉडकास्ट दरम्यान, कर्नरने रिलेशनशिप एक्सपर्टसह लोकांच्या लैंगिक संबंधांबद्दल संभाषण केले. यात त्यांनी जोडप्यांना त्यांच्या लैंगिक जीवनातील अडथळे व तणाव कसा दूर करता येईल हे सांगितले. विशेषत: ज्या जोडप्यांनी पालक बनण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्यासाठी या टिप्स उपयुक्त होत्या.
सोशल सायकोलॉजी अॅण्ड पर्सॅलिटी सायन्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, आठवड्यातून एकदा सेक्स करणारी जोडपी ही, त्यापेक्षा कमी सेक्स करणाऱ्या जोडप्यांपेक्षा समाधानी असल्याचे आढळले होते. आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा सेक्स केल्यामुळे नात्यात काही फरक पडलेला संशोधकांना आढळले नाही.
कर्नर म्हणाले की, सेक्स तीन प्रकारचा असतो. केवळ मनोरंजनासाठी होणारा, आपल्या जोडीदारासह नाते मजबूत करणारा आणि कौटुंबिक नियोजन करण्यासाठी केला जाणारा. तिन्ही प्रकारच्या सेक्सची स्वतःची महत्त्वपूर्ण भूमिका असते. अशा परिस्थितीत कोणत्याही फक्त एक प्रकारच्या सेक्सवर लक्ष केंद्रित केल्यास जोडप्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो आणि हळूहळू लैंगिक इच्छा कमी होऊ लागते. यासाठी जोडप्यांनी तीनही प्रकारच्या सेक्सचा आनंद घ्यायला हवा. (हेही वाचा: Sex Tips: सेक्स करण्याआधी करू नका 'ही' कामे अन्यथा घेता येणार नाही Orgasm चा अनुभव)
गर्भधारणेसाठी आयव्हीएफचा आधार घेणारे कपल्स सेक्स लाईफमध्ये तितकेसे संतुष्ट नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे सेक्स फक्त गर्भधारणेसाठी महत्वाचा नसून आनंदासाठीही तितकाच महत्वाचा असल्याचे कर्नर सांगतात. कर्नरच्या मते, लैंगिक संबंधांचे वेळापत्रक असणे आवश्यक आहे व त्यानुसार आठवड्यातून एकदा तरी सेक्स केला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, सेक्स कोणत्याही दबावाशिवाय केला पाहिजे.