Bouncer बॉयफ्रेंडसोबत Sex Game, गर्लफ्रेंडचा मृत्यू; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

पोलीसांनी घटनेची दखल घेऊन तातडीने घटनास्थळी उपस्थिती लावत तपास सुरु केला. तपासात भलतेच वास्तव निघाले. गर्लफ्रेंड असलेल्या तरुणीचा मृत्यू बाऊन्सर प्रियकरासोबत सेक्स गेम करताना नव्हे तर वेगळ्याच कारणाने झाल्याचे पुढे आले.

Sex Game | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

सेक्स गेम (Sex Game) करतान गर्लफ्रेंड (Girlfriend) चा मृत्यू झाल्याची माहिती एका बाऊन्सर बॉयफ्रेंडने (Bouncer Bouncer) पोलिसांना दिली. पोलीसांनी घटनेची दखल घेऊन तातडीने घटनास्थळी उपस्थिती लावत तपास सुरु केला. तपासात भलतेच वास्तव निघाले. गर्लफ्रेंड असलेल्या तरुणीचा मृत्यू बाऊन्सर प्रियकरासोबत 'सेक्स गेम' (Sex Game With Bouncer ) करताना नव्हे तर वेगळ्याच कारणाने झाल्याचे पुढे आले. प्रकरण तसे हायप्रोफाईल होते. कारण मृत्यू झालेली तरुणी ही एका ब्रिटीश अब्जाधीशाची मुलगी होती. एना रीड (Anna Reed) असे या मुलीचे नाव. ती जर्मन बाऊन्सर (German Bouncer) मार्क शेजल (Marc Schatzle) याची गर्लफ्रेंड होती. या गुंतागुंतीच्या प्रकरणात पोलीसांनी आता मार्क शॅट्झल याला ताब्यात घेतले आहे.

Marc Schatzle (मार्क शेजल ) याच्यावर आरोप आहे की, त्याने आपल्या गर्लफ्रेंड एना रीड हिची हत्या केली आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, एना रीड ही अब्दाधिशाची मुलगी होती. तिच्या खात्यावर कोट्यवधी रुपये होते. तिची हत्या झाल्यानंतर त्याने तिचे क्रेडिट कार्ट, एटीएम आणि मोबाईल गायब केला. त्यानंतर तिची हत्या केल्यावर पोलिसांना फोन करुन सांगितले की, तिचा मृत्यू सेक्स गेम वेळी झाला. (हेही वाचा, Mumbai Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या घरी पाठवले Sex Toys, मुंबईतील तरुणास अटक)

दरम्यान, आरोपीने कोर्टात गर्लफ्रेंडचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत माहिती दिली.'द सन' ने दिलेल्या वृत्तानुसार, स्वित्झरलँड येथील एका हॉटेलच्या खोलीत ब्रिटीश मुलगी एना रीड (वय 22 वर्षे) मृतावस्थेत सापडली. हॉटेलमध्ये ती आपल्या जर्मन बॉयफ्रेंड मार्क शेजल याच्यासोबत थांबली होती. शेजल हा जर्मन बाऊन्सर आहे. त्याच्यावर आरोप आहे की, त्याने डॉक्टर आणि पोलिसांना फोन करणयापूर्वी एना रीड हिची हत्या केली. दरम्यान, मार्क शेजल याने कोर्टात सांगितले की, त्याच्या गर्लफ्रेंडचा (एना रीड) हिचा मृत्यू सेक्स गेम (लैंगिक संबंध) करतेवेळी झाला.

शवविच्छेदन अहवालात एना रीड हिच्या मृत्यूचे कारण पुढे आले आहे. हा अहवाल सांगतो की, एना रीड हिचा मृत्यू गळा दाबल्याने झाला आहे. तिच्या शरीरावर छोटे ओरखडेही होते. तसेच तिचा हातही फ्रॅक्चर होता. मार्क शेजल शेजल हा एका नाईट क्लबमध्ये बाऊन्स म्हणून काम करत होता. त्याने एनासोबत शरीरसंबंध ठेवल्यावर तिचा गळा दाबला. दरम्यान शेजल याच्यावर 40 लाख रुपयांपेक्षाही अधिक कर्ज होते. त्याला जेव्हा कळले की त्याच्या गर्लफ्रेंडच्या खात्यावर 25 लाख रुपयांपेक्षाही अधिक पैसे आहेत तेव्हा त्याने ते पैसे हडप करण्याची योजना आखली. त्याने पहिल्यांदा एनाची हत्या केली. त्यानंतर तिचा मृत्यू लैंगिक संबंध ठेवताना झाल्याचे सांगितले. हे प्रकरण 2019 चे असून खटला न्यायालयात प्रलंबित आहे. लवकरच न्यायालय यावर निर्णय देण्याची शक्यता आहे. सुनावणीदरम्यान प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती पुढे येत आह.

कोर्टात सुनावणी वेळी साक्षीदार असलेल्या काही जोडप्यांनी सांगितले की, ही घटना घडली त्या दिवशी आम्ही बाजूच्या खोलीत होतो. एना आणि मार्क शेजल याच्या खोलीतून भांडणाचे, तसेच फर्निचर, टेबल आदळल्याचे, काचेचे साहित्य फुटल्याचे आवाज येत होते. शिवाय काहीसा गोंधळही ऐकू येत होता. एकूण वातावरण आवाज पाहता त्यांच्या खोलीत भांडण सुरु असल्याचे जाणवत होते. सांगण्यात येते आहे की, एना हिने मार्क शेजल याला खर्च केलेल्या लक्षावधी रुपयांचा हिशोब मागितला होता. तसेच, ते पैसे परतही मागितले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif