Sex Education: सेक्स करण्याची तीव्र इच्छा वारंवार होते? नियंत्रण मिळवायचे आहे?

तसेच, आपण त्यावर उपाय योजू इच्छित असाल तर आपणास एखाद्या चांगल्या सायकोलॉजिस्ट किंवा साइकियाट्रिस्टची आवश्यकता आहे. काही औषधे आणि उपाययोजना आदींमुळे यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

Sex Education | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महिलांच्या तुलने पुरुष हे सेक्स (Sex) करण्यासाठी अधिक उतावळे असतात, असे अनेक सर्व्हे आणि त्यांच्या अहवालातून पुढे आले आहे. अर्थात सेक्स (संभोग) करण्यासाठी उताविळ असण्यामध्ये महिलांही अगदिच मागे आहेत असेही नाही. काही महिलांही सेक्स करण्यासाठी पुरुषांइतक्याच उतावळ्या असतात. सांगण्याचा मुद्दा हा की स्त्री असो अथवा पुरुष यातील अनेकांना संभोग करण्याची तीव्र इच्छा वारंवार होते. इतकी की या व्यक्ती सेक्स अॅडीक्ट (Sex Addiction) वाटाव्यात इतकी. अनेकदा तर सेक्स करण्याच्या तीव्र आणि वारंवारची इच्छा अनेकांसाठी मानसिक स्वस्थ बिघडवणारी ठरते. त्यामुळे या तीव्र इच्छेपासून सूटका मिळविण्यासाठी अनेक स्त्री-पुरुष प्रयत्न करत असतात. अशा स्त्री-पुरुषांसाठी इथे काही पर्याय देत आहोत. ज्यामुळे सेक्स करण्याच्या तीव्र आणि वारंवारच्या इच्छेपासून सूटका होण्यास मदत होऊ शकते.

सेक्स करण्याच्या वारंवारच्या तीव्र इच्छेपासून सूटका कशी कराल?

जर तुम्ही सेक्स अॅडीक्ट आहात किंवा तुम्हाला सेक्स करण्याची इच्छा वारंवार आणि तिव्र स्वरुपात होत असेल. तसेच, आपण त्यावर उपाय योजू इच्छित असाल तर आपणास एखाद्या चांगल्या सायकोलॉजिस्ट किंवा साइकियाट्रिस्टची आवश्यकता आहे. काही औषधे आणि उपाययोजना आदींमुळे यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. जर स्वत:मध्ये अथवा आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये जर सेक्स अॅडीक्ट असण्याची काही लक्षणे दिसली तर आपल्या विश्वासातील व्यक्तीसोबत संवाद साधा. तसेच, योग्य मार्गदर्शकाचे मार्गदर्शन घ्या. (हेही वाचा, Sex Tips: सेक्स पूर्वी Masturbate केल्याने बेडवर जास्त वेळ टिकून राहण्यात होते मदत? जाणून घ्या उत्तर)

सेक्स करण्याच्या वारंवारच्या तीव्र इच्छेपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी पुढील गोष्टीही जरु ध्यानात ठेवा

मनामध्ये संभोग करण्याची तीव्र इच्छा निर्माण होणे यात काही वाईट नाही. पण त्याचा अतिरेक होत असेल तर ते वाईट असू शकते. तीव्र सेक्स (संभोग) करण्याचे विचार सातत्याने मनात बाळगणाऱ्या व्यक्ती या अनेकदा एकलकोंड्या अथवा मानसिक अस्थिर होऊ शककतात. त्यामुळे सर्वसाधारण गोष्टीचे रुपांतर गंभीर गोष्टीमंध्ये होण्यापूर्वीच सावध होणे केव्हाही चांगले. त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि स्वत:च्या जबाबदारीवर तज्ज्ञांकडून उपचार करुन घेणे केव्हाही इष्ट. लेटेस्टली मराठी कोणतेही उपचार, अथवा सल्ला सूचवत नाही. या लेखात दिलेली माहिती केवळ ज्ञानात भर या उद्देशाने दिलेली आहे. या मजकूराची आम्ही पूष्टी करत नाही.