POCSO Court: भिंन्नलिंगी मैत्रीण म्हणजे लैंगिक इच्छापूर्तीची उपलब्धी नव्हे- पॉक्सो कोर्ट
विरुद्ध लिंगाची मैत्रीण (Heterosexual Friendship) असणे म्हणजे ती लैंगिक इच्छा Sexual Desire ) पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे असे नाही, असे लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करणाऱ्या पॉक्सो न्यायालयाने (POCSO Court) म्हटले आहे. एका खटल्यात आरोपीला 10 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावताना न्यायालयाने असे म्हटले.
विरुद्ध लिंगाची मैत्रीण (Heterosexual Friendship) असणे म्हणजे ती लैंगिक इच्छा Sexual Desire ) पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे असे नाही, असे लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण करणाऱ्या पॉक्सो न्यायालयाने (POCSO Court) म्हटले आहे. एका खटल्यात आरोपीला 10 वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा ठोठावताना न्यायालयाने असे म्हटले. या खटल्यातील दोषी 20 वर्षांचा तरुण आहे. त्याने दूरची नातेवाईक असलेल्या 13 वर्षांच्या मैत्रिणीवर बलात्कार (Rape) केला होता. आरोपीने आरोपीने मुलीच्या जीवनात विध्वंस घडवून आणला आणि इतक्या लहान वयात स्वत:चे आयुष्यही उद्ध्वस्त केले, असेही न्याालयाने म्हटले.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, विशेष न्यायाधीश प्रिती कुमार घुले यांनी या घटल्यात निकाल दिला. निकाल देताना न्या. घुले म्हणाले की, 'या खटल्यात आरोपीला झालेल्या शिक्षेमुळे त्याच्या वयोगटातील इतर तरुणांनाही संदेश जाईल की, काही क्षणांची लालसा त्यांचे भविष्य, जीवन आणि आयुष्यातील प्रगतीचा सुवर्णकाळ बर्बाद करु शकते.' (हेही वाचा, Changes in Sex Life After 30: वयाच्या तीसाव्या वर्षानंतर लैंगिक जीवनात होतात 'हे' बदल)
न्यायालयाने पुढे म्हटले की, आरोपीने केवळ काही क्षणांच्या लैंगिक इच्छातृप्तीसाठी गैरकृत्य केले. ज्यामुळे त्याच्या तारुण्याच्या पदार्पणातच त्याचे आयुष्य अंधाराच्या छायेत आले. भविष्यातील प्रदीर्क काळ त्याच्यासाठी अंध:कारमय असू शकतो.
आरोपीला त्याच्या कृत्याची जाणीव झाली आहे, असे सांगत त्याला अधीक शिक्षा देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले. तसेच, अल्पवयीन पीडिता ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या योजनांतर्गत नुकसान भरपाईस पात्र आहे. आरोपीच्या कृतीमुळे पीडितेला आयुष्यात नाहक त्रास झाला. कदाचित तिच्या पुढील वैवाहिक जीवन सुरु करण्याच्या प्रक्रियेतही तिला अडथळे येऊ शकतात. कारण तिची प्रतिबद्धता आगोदरच खंडीत झाली असल्याचेही न्यायालयाने म्हटले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)