लेस्बियन मुलींची लव्ह स्टोरी भारत-पाकिस्तान व्हाया न्यूयॉर्क; अंजली चक्रा - सुंदास मलिक यांच्या नाजूक नात्याची हार्ड चर्चा
ती मुस्लिम परिवारातून येते. तर, अंजली चक्रा ही भारतीय आहे. दोघेही लेस्बियन असून, दोघींनी नुकतेच एक फोटोशूट केले आहे. दोघींचे खास अंदाजतील फोटो लोकांनाही चांगलेच आवडले आहेत. दोघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Lesbian Girls Love Story India-Pakistan Via New York: खऱ्या प्रेमाला लिंग, जात, धर्म, प्रदेश, देश याचे काहीच बंधन नसते. प्रेम कधीही आणि कोणावरही होऊ शकते. आजवर आपण अशी अनेक प्रेमी युगुलं पाहिली असतील. अगदी पुराणातील नल-दमयंती, हिर-रांजा, लैला-मजनू वैगेरे वैगेरे. पण, आज आम्ही आपल्याला अशा एका प्रेमी युगुलाबद्दल सांगत आहोत. ज्या युगुलाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ही प्रेम कहाणी आहे अंजली चक्रा (Anjali Chakra) आणि सुंदास मलिक (Sundas Malik) या लव्ह कपलची. दोघीही लेस्बियन (Lesbian). दोघींपैकी एक आहे भारतीय मुलगी तर दुसरी आहे पाकिस्तानी. पण, आपापल्या देशांतील संघर्ष सीमारेशांपलीकडच्या भींतीवर टांगून ठेवत या दोघांची प्रेमकहाणी फुलली. यांच्या लव्हस्टोरीला भारत(India)-पाकिस्तान (Pakistan) व्हाया न्यूयॉर्क असा वेगळा आंतरराष्ट्रय टचही आहे.
मुळची पाकिस्तानची आसलेली सुंदास मलिक ही आर्टिस्ट आहे. ती मुस्लिम परिवारातून येते. तर, अंजली चक्रा ही भारतीय आहे. दोघेही लेस्बियन असून, दोघींनी नुकतेच एक फोटोशूट केले आहे. दोघींचे खास अंदाजतील फोटो लोकांनाही चांगलेच आवडले आहेत. दोघींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सरोवर नावाच्या एका छायाचित्रकाराने अंजली चक्रा आणि सुंदास मलिक यांची छायाचित्रं (फोटो) काढली आहेत. या फोटोंचे प्रत्येकी चोर-चार अशा फोटोंचे एकून दोन सेट आहेत. पहिल्या फोटोमध्ये अंजली आणि सुंदास या एका पारदर्शी छताखाली आहेत. दोघीही आपल्या खास अंदाजात हसत एकमेकींकडे पाहात आहेत. पावसादरम्यान टीपलेली दोघींची ही छायाचित्रं फारच सुंदर आहेत. फोटोग्राफर सरोवर याने ट्विटरवर हे फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिले आहे 'ए न्यूयार्क लव स्टोरी'. (हेही वाचा, ताइवान बनला पहिला आशियाई देश जेथे समलैंगिक विवाहाला मिळाली मंजुरी)
फोटोग्राफर सरोवर याचे ट्विट
अंजली चक्रा आणि सुंदास मलिक या दोघीही गेले एक वर्षभर रिलेशनशिप मध्ये आहेत. दोघींची खास क्षणांची ही छायाचित्रं इंटरनेटवर शेअर करताच सोशल मीडियातून जोरदार व्हायरल झाली आहेत. दोघींनीही सोशल मीडियावरुन आपापली छायाचित्रं शेअर केली आहेत. संदस हिने म्हटले आहे की, मी एक वेगळ्या प्रकारचे प्रेम पाहात मोठी झाली आहे. काही आपल्या परिवारातून काही बॉलिवूड सिनेमांमधून मी जेव्हा थोडी मोठी झाले तेव्हा मला माझ्याबद्दल खरी ओळख पटली. मी माझ्यासारख्या लोकांचे प्रेम पाहिले नव्हते. मला आनंद आहे की, मला ही संधी मिळाली.
दरम्यन, अंजली चंक्रा हिने ट्विट करत म्हटले आहे की, त्या मुलीला खूप खूप शुभेच्छा. जीने मला प्रेम करायला शिकवले आणि माझ्यावरही प्रेम केले. या लेस्बीयन कपलच्या धाडसाबद्दल सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.