Oral Sex Tips: ओरल सेक्स करण्यापूर्वी 'या' गोष्टींची घ्या काळजी ज्यामुळे येणार नाही कोणतीच अडचण
ओरल सेक्स दरम्यान तुम्हाला ऑर्गेज्मचा अनुभव मिळावा आणि तुमचा जोडीदार देखील उत्तेजित व्हावा यासाठी ओरल सेक्स हा पर्याय निवडत असाल तत्पूर्वी पुढे दिलेल्या गोष्टींची काळजी अवश्य घ्या
सेक्स मधील ओरल सेक्स (Oral Sex) हा प्रकार सर्वांनाच आवडेल असे नाही. काहींना ओरल सेक्स करणे जास्त सोयीचे वाटते तर काहींना तो थोडेसे विचित्र वाटते. ओरल सेक्स (Sex) दरम्यान ते तितकेच हायजिन पद्धतीने व्हावे यावर अनेक जोडप्यांचा भर असतो. सध्याच्या कोरोनाच्या काळात कुणालाही कुठल्याच प्रकारची रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे ओरल सेक्स हा अनेकांनी पर्याय निवडला असेल. मात्र तरीही धोका टळलेला नाही. तुम्ही संभोगाऐवजी जरी ओरल सेक्स करत असाल तरीही काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
ओरल सेक्स दरम्यान तुम्हाला ऑर्गेज्मचा अनुभव मिळावा आणि तुमचा जोडीदार देखील उत्तेजित व्हावा यासाठी ओरल सेक्स हा पर्याय निवडत असाल तत्पूर्वी पुढे दिलेल्या गोष्टींची काळजी अवश्य घ्या
1. आंघोळ करा
ओरल सेक्स पूर्वी स्वच्छ आंघोळ करुन आपले शिस्न तसेच महिलांनी देखील आपले गुप्तांग स्वच्छ करुन घ्या. ज्यामुळे ओरल सेक्स दरम्यान आपल्याला वा आपल्या जोडीदाराला कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही.
2. प्युबिक एरिया मधील केस काढा
ओरल सेक्स करण्याआधी आपल्या प्यूबिक एरिया स्वच्छ केला पाहिजे. त्यासाठी तिथले केस कापून ती जागा पाण्याने छान स्वच्छ केली पाहिजे. असे न केल्यास या केसांमध्ये योनीतील वीर्य जमा होऊ शकतो. त्यामुळे तिथे विषाणू जमा होण्याची शक्यता असते आणि त्या जागेवर दुर्गंध देखील येऊ शकतो.हेदेखील वाचा- Sex Tips For New Year 2021: नववर्षात आपली सेक्स लाईफ आणखी बहरवण्यासाठी ट्राय करा Pinwheel, Wallflower 'या' हटके सेक्स पोजिशन्स
3. कंडोमचा वापर करा
ही ट्रिक्स तुम्हाला थोडी विचित्र वाटत असली तरीही ओरल सेक्स दरम्यान कंडोमचा उपयोग करणे खूप हायजिन ठरते. त्यामुळे तुमचा ओरल संक्रमणापासून बचाव होऊ शकतो.
4. तोंड स्वच्छ धुवा
ओरल सेक्स केल्यानंतर तुमचे तोंड स्वच्छ धुवून घ्या. असे न केल्यास तोंडात जेनिटल डिस्चार्ज जमा होऊ शकतो. ज्यामुळे संक्रमण होऊ शकतो.
5. आपल्या गुप्तांगावर कोणत्याही प्रकारच्या सुगंधी द्रव्यांचा उपयोग करु नये
आपल्या गुप्तांगावर सुगंधी द्रव्ये लावल्यास संक्रमण होऊ शकते. ज्यामुळे जेनिटल भागात खाज वा जळजळ होऊ शकते.
ओरल सेक्स मध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराला ऑर्गेज्मचा उत्कृष्ट अनुभव देऊ शकता. त्यासाठी तुम्ही ठराविक गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. ओरल सेक्स दरम्यान तुम्हाला अवघडल्यासारखे होत असल्यास तुमच्या जोडीदारासोबत त्यासंदर्भात बोला. मात्र ओरल सेक्स दरम्यान अशा प्रकारची स्वच्छता ठेवणे फार गरजेचे आहे हेही ध्यानात असू द्या.
(टीप: लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)