Monkey Sex Toys: माणूसच नव्हे  प्राणीही कामवासना तृप्तीसाठी वापरतात सेक्स टॉय आणि मिळवतात लैंगिक सूख; माकडे काय करतात? घ्या जाणून
Monkey Sex Toys | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कामवासना (Libido) शमविण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करतात. लैंगिक भूक भागविण्यासाठी कोणी जोडीदाराशी संभोग (Intercourse) करतो तर कोणी सेक्स टॉय (Sex Toy) वापरुन आपली लैंगिक इच्छातृप्ती (Sexual Desire) करण्याचा प्रयत्न करतो. पण हे केवळ मानवाच्या बाबतीतच होते असे नव्हे बरं. प्राणीही वेगवेगळ्या प्रकारचे सेक्स टॉईज वापरुन लैंगिक समाधान मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे एका संशोधनातून पुढे आले. इंडोनेशियात नुकताच याबबत एक अभ्यास पुढे आला. या अभ्यासानुसार इंडोनेशियातील माकडे नैसर्गिक साधनांचा वापर करुन लैंगिक तृप्ती घेत असल्या पुढे आले. लैंगिक तृप्तीसाठी (Monkey Sex Toys) ही माकडे विशिष्ट प्रकारचे दगड, विशिष्ट आकाराचे लाकूड, झाडांच्या फांद्या आदी गोष्टींचा लाभ घेत असल्याचे पुढे आले.

न्यू सायंटिस्टने एका अभ्यासामध्ये वर्तवलेल्या निरिक्षणांनुसार लांब शेपटीची माकडे (Macaca fascicularis) प्रामुख्याने विशिष्ठ प्रकारच्या दगडाचा वापर सेक्स टॉय सारखा करतात. ही वेगळ्या प्रजातीतील माकडे ते विशिष्ट आकाराचे दगड आपल्या गुप्तांगांना स्पर्शतील अशा पद्धतीने वारंवार वर्तन करत होती.अभ्यासकांनीही ही गोष्टी टीपली की ती माकडे ते दगड आपल्या गुप्तांगांना घासत होती. ही बाब अभ्यासकांनी माकडेही हस्तमैथून करतात या दाव्याच्या पुष्टीसाठी विशेष जोर देऊन मांडली आहे. (हेही वाचा, Sex Partners Of Women: पुरुषांच्या तुलनेत महिलांचे सेक्स पार्टनर अधिक, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणमध्ये खुलासा)

अभ्यासकांना असेही आढळू आले की, वेगवेगळ्या वयोगटातील मादी माकडे वेगवेगळ्या आकारांच्या दगडांचा वेगवेगळ्या पद्धतीने गुप्तांगांना स्पर्ष करीत होती. तर पुरुष माकडे वेगळे दगड वेगळ्या पद्धतीने पकडून गुप्तांगावर घासत होती.

कॅनडातील अल्बर्टा येथील लेथब्रिज विद्यापीठातील डॉक्टरेटचा अभ्यास करत असलेल्या कॅमिला सेन्नी आणि प्रमुख अभ्यासक कॅमिला सेन्नी यांनी लाइव्ह सायन्सला सांगितले की, माकडे दगड आपल्या गुप्तांगांना घासत असतात. पण ही कृती ते एकसारखी करत नाही. तुम्ही जर काही काळ निरीक्षण करत थांबला आणि पाहिले तर तुम्हाला जाणवेल की, माकडे ती कृती विशिष्ट वेळी विशिष्ट पद्धतीने करतातत.