Bodybuilder Yuri Tolochko: आगोदर Sex Doll सोबत विवाह, आता Ashtray च्या प्रेमात; कझाकिस्तानी बॉडी बिल्डर यूरी तोलोचको पुन्हा चर्चेत
कजाकिस्तान (Kazakhstan) देशातील हा बॉडिबिल्डर (Bodybuilder) सेक्स डॉल (Sex Doll) सोबत विवाह केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला होता. आता त्याला एशट्रे (Ashtray) च्या प्रेमात पडला आहे. विचित्र अशा प्रेमप्रकरणामुळे त्याचे चाहतेही अवाक झाले आहेत.
बॉडीबिल्डर (Bodybuilder) यूरी तोलोचको (Yuri Tolochko) पुन्हा एकदा जोरदार जोरदार चर्चेत आला आहे. कजाकिस्तान (Kazakhstan) देशातील हा बॉडिबिल्डर (Bodybuilder) सेक्स डॉल (Sex Doll) सोबत विवाह केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला होता. आता त्याला एशट्रे (Ashtray) च्या प्रेमात पडला आहे. विचित्र अशा प्रेमप्रकरणामुळे त्याचे चाहतेही अवाक झाले आहेत. प्रसारमाध्यमांतून चर्चेत असलेला हा बॉडीबिल्डर आणि त्याच्या प्रेम प्रकरणाविषयी अनेकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण.
बॉडीबिल्डर यूरी तोलोचको आणि त्याच्या नव्या प्रेमप्रकरणाबद्दल द मिरर ने वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, सेक्स डॉल सोबत विवाह केल्यानंतर यूरी तोलोचको (Yuri Tolochko And Sex Doll) याने दावा केला आहे की, त्याला आता Ashtray (ऐशट्रे/राखदानी) सोबत प्रेम झाले आहे. तोलोचको याचे म्हणे असे की, तो Ashtray सोबत झालेल्या प्रेमात अकंट डुंबला आहे. वेडा झाला आहे. या ऐशट्रेला तो एक कृत्रिम योनी लावण्याचाही विचार करतो आहे. (हेही वाचा, Bodybuilder Divorced Sex Doll Wife: बॉडीबिल्डर Yurii Tolochko याचा सेक्स डॉल पत्नीसोबत घटस्फोट)
यूरी तोलोचको हा सध्या 36 वर्षांचा आहे. त्याचे म्हणने असे की, Margo डॉल पासून विभक्त झाल्यानंतर तो आता बराच पुढे गेल आहे. आता त्याने एक नवे आयुष्य सुरु केले आहे. या वेळी त्याने Ashtray ला आपली प्रेमीका बनविण्याचे ठरवले आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये अनेक पाहुण्यांच्या उपस्थितीत त्याने एक समारंभ आयोजित करत सेक्स डॉल सोबत विवाह केला. त्यानंतर तो जगभरात चर्चेत आला होता. आता त्याला Ashtray सोबत प्रेम झाले आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत माहितीही दिली आहे.
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये यूरी लिहितो की, सर्वात आधी मी याच्यासोबत (Ashtray) फोटोशूट करण्याची व्यवस्था केली. परंतू, हा पुन्हा मला जवळ आकर्शित करु लागला. मी पुन्हा पुन्हा याला स्पर्श करु इच्छितो, वास घेऊ इच्छित होतो. मला याचा वास प्रचंड आवडतो. माझी त्वचा या मेटलच्या स्पर्षाची एक वेगळीच अनुभुती अनुभवते.