कंटाळवाण्या 'Sex Life' ला फ्लेव्हरफूल बनवतील 'हे' पाच भारतीय पदार्थ, आजपासूनच करा सेवनाला सुरुवात
सेक्स लाईफ मध्ये हरवलेला थ्रील परत आणायचा असल्यास तुम्हाला फक्त उठून किचन पर्यंत जाण्याची गरज आहे. तुमच्या जेवणात या भारतीय पदार्थांचा समावेश केल्यास सेक्स ड्राइव्ह वाढते असे काही सर्व्हेमधून समोर आले आहे.
घड्याळाच्या मागे पळताना अनेकदा खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष होते, यामुळे तब्येतीवर परिणाम होतो, पण याकडे त्वरित लक्ष न दिल्यास हा त्रास तुमच्या सेक्स लाईफ (Sex Life) मध्ये सुद्धा परावर्तित होऊ शकतो. काहीजण य त्रासापासून सुटका मिळावी म्हणून मग बाजारातील केमिकल युक्त औषधांचा आधार घेतात पण वास्तिवकता स्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच कठीण होऊन बसते परिणामी पार्टनरची सुद्धा निराशा होऊन सेक्स लाइफला जणू काही ग्रहण लागते. पण घाबरू नका यावर सुद्धा उपाय आहे! आणि त्यासाठी तुम्हाला बाजारात सुद्धा जायची गरज नाही तर हा उपाय तुमच्या किचन मध्ये सुद्धा सापडून जाईल.
नुकत्याच झालेल्या एका सर्व्हे नुसार भारतीय मसाले (Indian Spices) हे शरीरातील उत्तेजना (Sex Drive) वाढवण्यासाठी एखाद्या जादू प्रमाणे काम करतात. त्यामुळे जर का तुम्हालाही तुमची मुळमुळीत सेक्स लाईफ स्पाईस अप करायची असेल तर आजपासूनच जेवणात या मसाल्यांचा समावेश करा... बोअरिंग झालेल्या Sex Life ला असे बनवा रंगतदार; Kink, Sex Toys चाही होईल फायदा
1 ) मिरची
मिरचीचा झटका नुसता जिभेला लागला तरी भल्याभल्यांची हालत खराब होते,यावरून मिरची सेक्स लाईफ मध्ये काय फ्लेव्हर आणू शकेल याचा अंदाज येतच असेल. बाजारात मिळणाऱ्या हिरव्या किंवा लाल मिरचीच्या सेवनाने शरीराची चयापचय संस्था सुधारते . मिरची मधील कॅप्सिकीन या नैसर्गिक रसायनामुळे शरीरात रक्तप्रवाह वाढतो. मिरची खाल्ल्यावर हृदयाचे ठोके वाढतात परिणामी लैंगिक अवयवांना अधिक रक्त पुरवठा होतो. यामुळे शरीर एन्डोरफीन हे रसायन सोडते आणि उत्तेजक भावना वाढतात.
2) मेथी
एका सर्वेक्षणाच्या निकालानुसार मेथीचे सेवन दररोज करणाऱ्या पुरुषांमध्ये तुलनेत २८ टक्के अधिक कामेच्छा जागृत होतात. तसेच मेथीमधील सैपोनिन्स हे पोषकतत्व पुरुषांमधील हॉर्मोन्स मध्ये वाढ करतात. परिणामी मेथी खाल्ल्याने शरीरात टेस्टरॉन व ऑक्साईड वाढून शिश्नात ताठरता येण्यास मदत होते. तुम्ही मेथीचे सेवन ताज्या भाजीच्या किंवा सुकवलेल्या रूपात देखील करू शकता. लिंगाच्या लहान आकारामुळे निराश? जाणून घ्या स्त्रीला Sex मध्ये संतुष्ट करण्यासाठी पुरुषाचे शिश्न किती लांबीचे असावे
3)लसूण
लसूण हा भारतीय पदार्थांमधील सर्वात महत्वाचा भाग मानला जातो.यामुळे रक्ताची गुणवत्ता सुधारते तसेच राकप्रवाह देखील वाढतो. लसूण मध्ये असणारी नैसर्गिक उष्णता शरीरात ऍलिसिन या रसायनाची वाढ करते ज्यामुळे लिंग ताठ होण्यास मदत होते. लसूण खाल्ल्याने घामाचा दुर्गंध येत नाही ज्याचे महिलांना सर्वाधिक आकर्षण वाटते. मात्र लसूण खाल्ल्यावर तुमच्या श्वासात दुर्गंध येण्याची शक्यता आहे त्यामुळे चूळ भरून मगच पार्टनर जवळ जा.सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या चार पाकळ्या खाल्ल्यास काही दिवसात तुमची सेक्सची इच्छा वाढलेली दिसून येईल, पण यासाठी संयम आवश्यक आहे. तोंडाला येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी करा हे 10 घरगुती उपाय
4)आलं
आलं हे रक्तासाठी किती फायदेशीर आहे हे नव्याने सांगयला नकोच, मात्र आल्याच्या सेवनाने वीर्यात देखील मोठे बदल होतात. आल्यातील मँगनीज हे नैसर्गिक रसायन वीर्य अधिक गडद करण्यास मदत करते तसेच वीर्यपतनाच्या समस्येपासून देखील सुटका होते. आल्याचे सेवन हे चहामध्ये किंवा जेवणातून करावे, याशिवाय रोज सकाळी अर्ध्या उकडलेल्या अंडयासोबत आल्याचा अर्धा चमचा रस आणि मध मिसळून खाल्ल्यास सेक्स दरम्यान अधिक वेळ स्टॅमिना टिकून राहण्यास मदत होते.
5)वेलची
वेलचीच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे शरीरातील रक्ताची उष्णता संतुलित राहते. त्यामुळे हवामात थंडी असल्यास रक्त गरम करण्यास तर उन्हाळयात थंडावा देण्यास वेलचीचा फायदा होतो. याशिवाय वेलचीमुळे श्वासात सुगंध येतो त्यामुळे पार्टनर अधिक आकर्षित होऊ शकतो. चहा किंवा कॉफी मध्ये वेलची आलं आणि लाल मिरचीच्या बिया वाटून टाकल्यास शरीरात कामुक भावना उत्तेजित होतात.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)