सणासुदीच्या काळात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी 'या' सोप्प्या टीप्स जरुर फॉलो करा
अशातच धावपळ आणि अन्य कामांमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यावर आपल्याला वेळेच मिळत नाही. परंतु आपल्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे सर्वाधिक महत्वाचे काम आहे.
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच धावपळ आणि अन्य कामांमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यावर आपल्याला वेळेच मिळत नाही. परंतु आपल्या स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे सर्वाधिक महत्वाचे काम आहे. कारण तुम्ही जर तंदुरुस्त असाल तरच पुढची काही कामे तुम्ही करु शकता. यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणे, पोषक आहार घेणे आणि अतिप्रमाणात तळललेल्या पदार्थांपासून दूर राहणे हे नेहमीच आपल्याला सांगितले जाते. तर सणासुदीच्या काळात सुद्धा तुम्ही अगदी काही सोप्प्या टीप्स फॉलो करुन स्वत:ला फिट ठेवू शकता.
तर दिवाळीच्या खरेदीसाठी किंवा घराची साफसफाई जरी करणार असाल्यास स्वत:ला हायड्रेट ठेवा. कारण तुम्हाला जर काम करताना सुस्ती येत असेल किंवा आळस वाटत असेल तर त्यावेळी पाणी प्या. या व्यतिरिक्त तुम्हाला हायड्रेट ठेवतील अशी फळ किंवा ज्यू प्या.(मुलांच्या मानसिक वाढ, विकासासाठी आहारातील हे Foods ठरतील प्रभावी, घ्या जाणून)
त्याचसोबत तुमच्या डाएटमध्ये फळ किंवा पालेभाज्यांचा समावेश करावा. त्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. विटामिन सी असलेल्या गोष्टींचा सुद्धा खुप वापर खाण्यात करावा. यामुळे तुमची पाचक्रिया सुरळीत राहते. पपई, अननस आणि सफरचंद सारख्या फळांमध्ये शरिराला डिटॉक्स करणारे गुण असतात.
या व्यतिरिक्त दिवाळीच्या वेळी तयार करण्यात आलेला फराळ खुशाल खा. पण तळलेल्या पदार्थांचे प्रमाण त्यामध्ये कमी असू द्या. त्याचसोबत जर तुम्हाला अतिप्रमाणात एखादी गोष्ट खाण्याची सवय असेल तर ती कमी करा. तुम्ही दर 2 तासांनी पचनास हलक्या अशा गोष्टी खाऊ शकता.
आणखी महत्वाचे म्हणजे शरिराला डिटॉक्स करण्यासाठी दररोज व्यायाम करणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे चयापचनास खुप मदत होते. त्या संबंधित समस्या सुद्धा दूर ठेवण्यास फायदेशीर ठरते. दिवाळीच्या काळात तुम्हाला जर एक तास व्यायाम करणे शक्य नसेल तर किमान अर्धा तास तरी योगा करा. त्यामुळे तणाव दूर होतो आणि मेटाबॉलिज्म सुद्धा नियंत्रणात राहते. तसेच कमीत कमी 6-8 तासांची झोप पूर्ण होणे फार महत्वाचे आहे. अन्यथा तुमची चिडचिड होणे, डोके दुखण्याची शक्यता अधिक असते.